Перейти к содержимому

साल्हेर - महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला - Salher Fort - Baglan Range Trek

Travelkar Pranav

0:00 / 0:00

साल्हेर - महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला - Salher Fort - Baglan Range Trek

1 093 просмотра · 5 лет назад
Travelkar Pranav
5,43 тыс. подписчиков
1 093 просмотра · 5 лет назад
Follow us on instagram for more insights @travelkarpranav @purva_pranav_joshi साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो. नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणा तालुक्यातच आहेत. साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैर्ऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदिस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते. साल्हेरचा माथा हा चारही बाजूने उंच कातळकड्यांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती. माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. गंगासागर तलावाशेजारी गंगा -यमुना टाके आहे. ह्यांचे पाणी व गंगोत्री -यमनोत्री च्या उगमाचे पाणी सारखे आहे असे डॉ. रघुराज महाराज ह्यांनी शोधले होते. साल्हेघरांची जोतीही या भागात पहायला मिळतात. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत. गडाच्या पायथ्याला साल्हेर निवासिनी गडकलिका देवीचे सुंदर मंदिर आहे . तसेच गृहस्वरूप अमृताभवानी व सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे. तसेच माथ्यावर मंदिर रेणुका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. ह्या देवीला अक्षगंगा सुद्धा म्हणतात . या माथ्यावरूनच बाण मारून परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले. अशी कथा येथे ऐकवली जाते. समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. साल्हेरच्या माथ्यावरुन अचला, अहिवंत मार्कींडय़ा, रावळा-जवळा, धोडप, कांचन, राजदेहेर , चौल्हेर, भिलाई, मुल्हेर, मोरा, रतनगड, पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात. तसेच जवळच्या सालोटा किल्ल्याचे तसेच टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तसेच समोर नाखिंद्या व कोठ्या डोंगर लक्ष वेधतात. ________________________________________________________________________ Sahaydri Treks series :https://www.youtube.com/watch?v=xyYy1... Backpacking Maharashtra :    • Dapoli - Top things you must be doing when...   Konkan Fort series : https://www.youtube.com/watch?v=XdVja... Gokarna beach trek series : https://www.youtube.com/watch?v=nOOtc... Exploring Manipur Series:    • Loktak Lake | Where everything floats | Ex...   Malaysia in Rs.15000/- series : https://www.youtube.com/watch?v=1oIT-... _________________________________________________________________________