| अडीच महिन्याच्या खाडीतील विश्रांतीनंतर | बोटी निघाल्या सिंधू सागराकडे |अर्नाळा कोळीवाडा
Koliyache Bol
0:00 / 0:00
| अडीच महिन्याच्या खाडीतील विश्रांतीनंतर | बोटी निघाल्या सिंधू सागराकडे |अर्नाळा कोळीवाडा
17 500 просмотров · 2 недели назад
Koliyache Bol
6,71 тыс. подписчиков
17 500 просмотров · 2 недели назад
अडीच महिन्याच्या खाडीतील विश्रांतीनंतर | बोटी निघाल्या सिंधू सागराकडे |अर्नाळा कोळीवाडा
सिंधू सागराशी संघर्ष करून उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी बांधवांच्या बोटींचा गेली अडीच महिने खाडीतल्या विश्रांतीचा काळ होता. तीर्थयात्रा आटोपून तो पुन्हा एकदा आपल्या चरितार्थाच्या मार्गाला लागला. खाडी किनारी नांगरलेल्या बोटी पुन्हा सिंधू सागराच्या दिशेने निघाल्या.
आजचा प्रवास चिखल डोंगरी खाडी कडून अर्नाळाच्या समुद्राकडे. या खाडीकडे जाताना काही बदलहि जाणवले. शहरातून येणारं सांडपाणी समुद्रकिनारे दूषित करीत आहेत. एकेकाळी रेती व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या या चिखल डोंगरे गावावर अवकळा पसरली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याला वाढतं शहरीकरण कारणीभूत आहे. एके काळी हा खाडी परिसर फ्लेमिंगो पक्षी तसेच निरनिराळ्या जैवविविधतेसाठी प्रसिद्ध होता. पण हे सर्व काळाच्या पडद्याआड जात चाललं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संवेदना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
वादळ वाऱ्याशी संघर्ष करण्यापूर्वी आमचा कोळी बांधव त्या परमेश्वराला सामोरा जातो. त्याच्या समोर नतमस्तक होतो. देव कुठलाही असू द्या गणपती बाप्पा असू द्या, प्रभू रामचंद्र असू द्या किंवा मारिया माता... त्यांच्या नामस्मरणाने त्याला आत्मविश्वास मिळतो.. आणि तो आश्वस्त होतो..
या सर्व गोष्टींसोबत कोळी बांधवांची खोल समुद्रात मासे पकडायला जाण्याची अविश्रांत तयारी तुम्हाला या व्हिडिओत दिसेल...
हे सर्व करत असताना बिल्डिंग नावाचा भस्मासुर या खाडीकिनाऱ्यावर चालत येत असल्याचा आभास होत राहिला.. आणि हे असंच होत राहिलं तर या विश्वातील एक आदिम जात लवकरच काळाच्या पडद्याआड जाईल ही भीती वाटत राहिली...
हा माणूस टिकवायचा असेल तर खाडी किनारे टिकवावे लागतील..
हा व्हिडिओ पाहून तुमच्या कमेंट अवश्य कळवा..
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पहायचे असतील तर आपल्या koliyache bol या youtube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका..