वसईत दफनभूमीसाठी रस्त्यावर उतरणार MIM ? वारिस पठाण यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
HP Live News
0:00 / 0:00
वसईत दफनभूमीसाठी रस्त्यावर उतरणार MIM ? वारिस पठाण यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
1 487 просмотров · 22 ч назад
HP Live News
306 тыс. подписчиков
1 487 просмотров · 22 ч назад
Vasai-Virar: AIMIM Warns of Massive Protest Over Suncity Burial Ground Permission
*वसई-विरारमध्ये सर्वधर्मीय दफनभूमीच्या परवानगीवरून एमआयएम आक्रमक; वारिस पठाण यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!*
वसई येथील सनसिटी परिसरातील सर्वधर्मीय दफनभूमीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तयार असलेल्या दफनभूमीला प्रत्यक्ष दफनविधीसाठी प्रशासकीय परवानगी मिळाली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे प्रवक्ते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत दफनभूमी तातडीने खुली करण्याची मागणी केली.
वारिस पठाण यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रश्न २०१२ पासून प्रलंबित आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या सुमारे ६ एकर जागेवर मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत, बोहरा, आगाखानी आणि शिया समाजांसाठी स्वतंत्र दफनविधीची व्यवस्था नियोजित करण्यात आली होती.
महापालिकेने सुमारे ४ कोटी रुपये खर्चून संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार उभारले आहे. मात्र, दफनभूमीच्या वापरास अद्याप परवानगी मिळालेली नाही, असा आरोप एमआयएमने केला आहे.
परवानगीअभावी नागरिकांना दफनविधीसाठी ७ ते ८ किलोमीटर अंतरावर जावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा वारिस पठाण यांनी दिला आहे.
*या प्रकरणावर वारिस पठाण नेमकं काय म्हणाले? पाहा HP Live News चा सविस्तर रिपोर्ट.*
📺 HP Live News – आपल्या परिसरातील बातम्या, थेट आपल्यापर्यंत!
👍 व्हिडिओ Like करा
💬 आपले मत Comment मध्ये नोंदवा
🔔 स्थानिक बातम्यांसाठी Channel Subscribe करा
📲 बातमी Share करा
#VasaiVirar #WarisPathan #AIMIM #VasaiNews #SuncityVasai #BurialGround #VVCMC #HPLiveNews #MaharashtraNews #BreakingNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...