Перейти к содержимому

“त्या एका निर्णयाची किंमत आम्ही खूप मोठी मोजली…”🥹#TriveniJagtap #MyLifeStory #MarathiVlog

Triveni Jagtap vlogs

0:00 / 0:00

“त्या एका निर्णयाची किंमत आम्ही खूप मोठी मोजली…”🥹#TriveniJagtap #MyLifeStory #MarathiVlog

38 924 просмотра · 10 часов назад
Triveni Jagtap vlogs
91,1 тыс. подписчиков
38 924 просмотра · 10 часов назад
नमस्कार ❤️ माझ्या आयुष्यातील प्रवासाचा हा दुसरा भाग आज तुमच्यासोबत शेअर करतेय. आयुष्यात काही निर्णय आपण कमी वयात घेतो, तेव्हा कदाचित त्यामागची पूर्ण maturity किंवा अनुभव आपल्याकडे नसतो. आमच्याही आयुष्यात काही निर्णय चुकले, व्यवसाय करताना काही गोष्टींचा पुरेसा विचार झाला नाही आणि छोटं कर्ज कधी मोठ्या कर्जात बदलत गेलं, हे आम्हालाही कळलं नाही. त्या काळात लोकांनी काय काय बोललं, “तुम्ही चैन केली”, “तुम्ही उधळपट्टी केली” अशा गोष्टी ऐकूनही त्या परिस्थितीला मी कसं सामोरं गेले, माझ्या स्वभावात काय बदल झाले, आहोंनी आणि माझ्या दोन्ही लेकींनी मला कसा आधार दिला, हे सगळं आज मनापासून शेअर केलं आहे. पण या संपूर्ण प्रवासाकडे मागे वळून पाहताना मला सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती वाटते माहितीये? माझ्या पदरात देवाने दिलेल्या माझ्या दोन लेकी. ❤️ आणि या निमित्ताने प्रत्येक आईला एक छोटीशी विनंती… जर एखाद्या आईला दोन मुली असतील, तर कृपया तिला “मुलगा नाही का?” असं विचारू नका. आई म्हणून आपण कितीही मजबूत असलो, तरी असा प्रश्न मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक क्षणभर विचार निर्माण करतो—“खरंच, मुलगा असायला हवा होता का?” म्हणून मुलगा-मुलगी अशी तुलना न करता प्रत्येक आईच्या पदरात आलेल्या लेकरांना तितकंच प्रेम आणि मान द्या. कदाचित देवाने तिच्या पदरात दोन मुली दिल्या असतील कारण त्या दोन मुलींना घडवण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची क्षमता त्या आईमध्ये असेल. ❤️ तुम्हाला दोन मुली असतील, दोन मुलं असतील किंवा एक मुलगा-एक मुलगी असेल—प्रत्येक लेकरं ही त्या आई-वडिलांच्या आयुष्यात आलेली एक जबाबदारी आणि सुंदर संधी आहे. हा माझ्या आयुष्यातील काही कटू-गोड प्रसंगांचा, चढ-उतारांचा आणि त्यातून शिकलेल्या गोष्टींचा प्रामाणिक प्रवास आहे. तुम्हाला या भागातली कोणती गोष्ट सर्वात जास्त मनाला लागली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ — त्रिवेणी जगताप Jagtap vlog, माझ्या आयुष्याचा प्रवास, माझी स्ट्रगल स्टोरी Part 2, Marathi struggle story, Marathi life story, कर्जाचा प्रवास, व्यवसायातील चुका, आयुष्यातील चढ उतार, दोन मुली, मुलगा नाही का, मुलगा मुलगी भेदभाव, मुलींचे महत्व, मुलींबद्दल विचार, आईची भावना, Marathi emotional vlog, Marathi family vlog, Marathi women story, life lessons Marathi, माझी कहाणी, संघर्षाची कहाणी