Перейти к содержимому

Navnath Maharaj | प्राचीन रहस्यमयी नवनाथ मंदिर | श्री क्षेत्र डोर्हाळे | @AlakhNiranjanMS #shirdi

Adesh Sainath

0:00 / 0:00

Navnath Maharaj | प्राचीन रहस्यमयी नवनाथ मंदिर | श्री क्षेत्र डोर्हाळे | @AlakhNiranjanMS #shirdi

2 211 просмотров · 1 г. назад
Adesh Sainath
24,6 тыс. подписчиков
2 211 просмотров · 1 г. назад
‪@Adesh_sainath‬ ओम नमो आदेश मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत डोर्हाळे या गावातील रहस्यमयी व प्राचीन नवनाथ मंदिराला     मित्रांनो नाथ संप्रदाय हा एक भारतीय शैव संप्रदाय. या संप्रदायाचा उगम कली युगाच्या प्रारंभी आदिनाथ परमेश्वर म्हणजे भगवान शिव शंकर यांच्यापासून झाला. म्हणून याला नाथ संप्रदाय म्हणतात. ‘नाथ’ म्हणजे रक्षण करणा रा स्वामी व नाथ संप्रदाय म्हणजे रक्षण करणाऱ्या स्वामींचा संप्रदाय होय.मित्रांनो नाथ संप्रदायाचा विस्तार अवघ्या जगभरात झाला आहे. तसेच श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील परम पवित्र दैवी कथा ज्या ठिकाणी घडल्या ती ठिकाणे आजही आपल्याला त्या दिव्य कथांची साक्ष देतात. नाथयोगी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा करीत. व भारतातच नव्हे तर जगभरात सर्वत्र त्यांचे मठ व मंदिरे तसेच त्यांचे समाधी क्षेत्रे आहेत. काही मंदिरे तर इतकी जुनी व रहस्यमयी आहेत. की त्या बद्दल अद्यापही पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तर आज आपण अश्याच एका नाथ संप्रदायाच्या रहस्यमयी मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर महाराष्ट्रातील अहिल्या नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील डोर्हाळे या गावी आहे. डोर्हाळे हे गाव शिर्डी पासुन साधारण ५ ते ६ किलोमीटर अंतरावर आहे. हा परीसर देवादिकांच्या काळात दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे. व या परीसरात अनेक प्राचीन रहस्यमयी मंदिरे आहेत . त्यातीलच एक हे नवनाथ मंदिर आहे. या गावाचे मुख्य  ग्रामदैवत हे नवनाथ मंदिरच आहे. हे मंदिर किती जुने आहे हे अद्यापही कोणाला माहिती नाही. या मंदिराचा जिर्णोद्धार दरम्यानच्या काळात झालेला आढळतो. मुख्य गाभाऱ्यासमोर भव्य असा सभामंडप आहे. गर्भगृहाचे दगडी द्वार बघुन हे मंदिर अंदाजे हजारो वर्षांपूर्वीचे आहे असे वाटते. या द्वारावर एक दगडी शिलालेख आहे. व त्यावर काहीतरी नमुद केले आहे.पण बर्याच जाणकारांनी हे वाचण्याचा प्रयत्न केला पण ते असफल ठरले. गर्भगृहात दोन समाधी आहे. व या समाधी कधीच्या आहे याबद्दल सुद्धा पुरेशी माहिती उपलब्ध नाही. असे म्हणतात की या नाथांच्या समाध्या आहेत.पन कोणत्या नाथांच्या आहे हे अद्यापही एक रहस्यच आहे. व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजही या ठिकाणी प्रती वर्षी श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी येथे नाथ बाबांची यात्रा गेली कित्येक शतकांपासून अखंड पने सुरू आहे. यात्रेच्या अगोदर गावातील लोक काशीहून गंगेचे पाणी  घेऊन येतात. व या दिवशी सकाळी कावड मिरवणूक होते. यात्रेच्या सात दिवस अगोदर सप्ताह कार्यक्रम चालतो व उत्सव च्या दिवशी दुपारी खुप मोठा अन्नदानाचा भंडारा घालून कार्यक्रमाची सांगता होते. मित्रांनो जसे नाथांचे कार्य प्रताप शाली व थोर असे होते तसेच त्यांच्या मंदिरांचे रहस्य सुद्धा खुप गुढ होते. आजपर्यंत कोणीही हा शिलालेख वाचु शकले नाही व या मंदिराचे रहस्य उलगडु शकले नाही. नाथ शक्ति येथे आल्यावर समजते मित्रांनो या मंदिरामध्ये प्रखर अशी ऊर्जा आहे व ही ऊर्जा मी स्वतः अनुभवली आहे. तुम्हीही या मंदिराला अवश्य भेट द्या व मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की  करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम चैतन्य नवनाथाय नमः ओम नमो आदेश अलख निरंजन #navnathparayan #navnathinformation #kanifnathmaharaj #आदेश #अलख #अलखनिरंजन#hindusaint #ancienthistory #maharashtra #maharashtraculture #devotionalplaces #spritual #spritualpath #devotional #devotion #नवनाथ #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #rahuri #shirdi #maharshtra #nathsampraday #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus #sai #shirdisai #shirdisaibaba #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers#mystery #mysterious #mysteries