Srushti Hospital - Dr Radheshyam Chaudhari | सृष्टी हॉस्पिटल - डॉ. राधेश्याम चौधरी
Srushti Hospital Jalgaon - Dr Radheshyam Chaudhari
0:00 / 0:00
Srushti Hospital - Dr Radheshyam Chaudhari | सृष्टी हॉस्पिटल - डॉ. राधेश्याम चौधरी
1 270 просмотров · 4 года назад
Srushti Hospital Jalgaon - Dr Radheshyam Chaudhari
56 подписчиков
1 270 просмотров · 4 года назад
नमस्कार,
सर्वांना अक्षय तृतियेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
आज वैद्यकिय सेवेचा १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक नविन संकल्प घेवून आपल्याशी हितगुज साधत आहे.आजपासून महिन्यातून ठराविक वेळी यु ट्युब चॅनेल व फेसबुक पेजच्या माध्यमातून व्हीडीयोद्वारे मातृशक्तीच्या आरोग्याविषयी हितगुज साधणार आहे.
स्त्री रोग व प्रसुति तज्ञ म्हणून माता बघिनींच्या आरोग्याच संरक्षण ,संवर्धन करण्याच काम आम्ही करत असतो. स्त्रियांना जीवनात किशोरावस्था, युवावस्था, मातृत्व, मेनोपॅाज आदि आमुलाग्र शारीरिक, भावनिक, मानसिक बदलाच्या विविध अवस्थांचा सामना करावा लागतो.स्वताच्या आरोग्या बरोबरच प्रचंड कौटूंबिच जबाबदार्यांचा भार आयुष्याच्या विविध टप्यावर मातृशक्तीला पेलावा लागतो. म्हणून महिला वर्गाच शारीरीक, भावनिक, मानसिक आरोग्य संवर्धनासाठी हा छोटासा प्रयत्न करत आहोत.
‘सर्वे भवन्तु सुखिन,
सर्वे सन्तु निरामय’
अर्थात सर्व सुखी राहो,सर्व रोगमुक्त राहो,सर्वच मंगलमय घटनांचे साक्षीदार राहो ,कुणाच्याही वाटेला दु:ख येवू नये.
या आपल्या वैश्विक धारणेला अनुसरून यापुढेही मातृशक्तीच्या आरोग्यरक्षणासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प करतो.
धन्यवाद .
डॅा राधेश्याम चौधरी, डॅा श्रद्धा चौधरी ,
सृष्टी हॅास्पिटल,जळगाव.