Перейти к содержимому

शाळा वाचवण्यासाठी माजी मुख्याध्यापकांची धडपड | शिक्षक भरतीत झाला लाखोंचा भ्रष्टाचार

Bhushan Karekar

0:00 / 0:00

शाळा वाचवण्यासाठी माजी मुख्याध्यापकांची धडपड | शिक्षक भरतीत झाला लाखोंचा भ्रष्टाचार

1 592 просмотра · 5 лет назад
Bhushan Karekar
33,5 тыс. подписчиков
1 592 просмотра · 5 лет назад
शाळा वाचवण्यासाठी माजी मुख्याध्यापकांची धडपड | शिक्षक भरतीत झाला लाखोंचा भ्रष्टाचार कै. शंकर महादेव सावंत , संस्थेचे संस्थापक. यांची आज १०३ वी जयंती आहे.... या निमित्ताने त्यांना माझे विनम्र अभिवादन ! --------------------------- निसर्गसंपन्न कुंभवडे गाव.... गावाच्या भोवती असंख्य धबधब्यांची फेर धरलेला तुम्हाला पाहायला मिळेल. गावाच्या मधोमध आता जीर्णोद्धार केलेले परंतू प्राचीन शिवमंदिर आणि त्याच्या अलीकडेच, एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण असलेले...... उपक्रमशील व गुणवत्तेसाठी सुप्रसिद्ध असलेले शंकर महादेव विद्यालय व सौ सुगंधा वसंत सावंत गुरुकुल तुम्हाला पहावयास मिळेल.... नेमबाजी ,अश्वारोहण, गिरिभ्रमण तसेच जेव्हा बोर्डाचा निकाल चाळीस ते पन्नास टक्के लागत त्या काळात एसएससी परीक्षेच्या शंभर टक्के निकालासाठी जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून -अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी गौरवलेले हे शैक्षणिक संकुल........ त्यावेळी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी ,व सिंधुदुर्गच्या कानाकोपर्‍यातून अप्रगत विद्यार्थी नापास होणारे विद्यार्थी या आपल्या शाळेत येऊन, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झालेले पाहायला मिळतील... आज मात्र हे शैक्षणिक संकुल गलितगात्र अवस्थेत आहे ... या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद गणपत सावंत हे आहेत यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरील असल्याने त्यांना पुरेसा लक्ष देणे शक्य नाही.... त्यानी मोठ्या विश्वासाने, या संस्थेची संपूर्ण जबाबदारी संस्थेचे - सचिव शालेय समिती चेअरमन, गुरूकुल कार्याध्यक्ष.... थोडक्यात सर्वेसर्वा शशिकांत पांडुरंग सावंत यांच्यावर सोपवली. इथेच गफलत झाली.... या सर्वांचा गैरफायदा घेऊन शिक्षक भरतीमध्ये महाघोटाळा झाला आहे. ही संस्था म्हणजे आपल्या बापजाद्याची प्रॉपर्टी समजून..... शाळेच्या सर्व कर्मचाऱ्यांना यांने खाजगी कामासाठी वापरले... जुलमी व अन्यायकारक वागणुकीमुळे या शाळेच्या पाच नामवंत शिक्षकांपैकी, तीन शिक्षकांना सेवेत असतानाच जीव गमवावा लागला. मी, दिलीप गोविंद कारेकर. मुख्याध्यापक म्हणून या प्रशालेमध्ये सव्वीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर जून 2013 मध्ये निवृत्त झालो , परंतु मी सेवेत असतानाच जानेवारी 2013 मध्ये,शालेय समितीचे चेअरमन समजणारे शशी सावंत यांनी मला पूर्णपणे अंधारात ठेवून, मुख्याध्यापकाच्या जागी सहाय्यक शिक्षक कै. हनुमंत गोविंद दळवी यांच्या सह्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे ,.... इयत्ता पाचवी ते दहावीच्या सहा वर्गांसाठी गरज नसताना मराठी विषयासाठी तीन शिक्षकांच्या नेमणुका केल्या. या शाळेत इंग्रजी गणित व सायन्स या विषयांसाठी मात्र एक एकच शिक्षक कार्यरत आहे. शाळेचे वेळापत्रक हे सेहेचाळीस तासिकांचे असते तर एका शिक्षकाला आठवड्यात छत्तीस ते अडतीस तासीका घ्याव्या लागतात.... शाळेच्या गरजेच्या अगदी विपरीत भरती झाल्याने शाळेचे वेळापत्रक तयार होत नाही व शाळा नीट चालवता येत नाही अशी शाळेत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. विषय निहाय योग्य संख्येत शिक्षक नसल्याने शाळेची गुणवत्ता ही घसरलेली आहे. गुणवंत व उपक्रम शिक्षकांना निवडीमध्ये प्राधान्य न दिल्याने शाळेत जे उपक्रम चालू होते ते बंद पडले आहेत... याचा एकंदरीत परिणाम म्हणून गुरूकुल मध्ये बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. मुळात गावांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशी नसल्याने गुरुकुल सुरू केले होते. प्राप्त परिस्थितीत, गुरुकुलमधून शाळेला मिळणारी विद्यार्थी संख्या कमी झाली व विद्यार्थी संख्येअभावी शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहे. याबाबत माननीय अध्यक्ष याना मी गेल्या वर्षी जुलैमध्ये पत्रव्यवहार केला होता. माननीय शिक्षणाधिकारी यांना सुद्धा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पत्रव्यवहार केला होता परंतु संस्था व शिक्षण विभाग ,( माध्यमिक) सिंधुदुर्ग , यांच्या संगनमतानेच ही भरती झालेली असल्याने त्यावर वर्षभरात कोणतीही कार्यवाही झाली नाह. म्हणून मी 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसलो होतो. माननीय शिक्षणाधिकारी यांच्या विनंतीवरून माननीय नामदार उदय रवींद्र सामंत जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याबाबत माझे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेऊन, मी जे निवेदन दिले तेही स्वीकारले...... व जिल्ह्याचे सीईओ व कलेक्टर यांना संबंधित बाबतीत चौकशीचे आदेश दिले. आणि त्यांच्या विनंतीवरून मी माझे उपोषण मागे घेतले आहे. वेळीच योग्य चौकशी होऊन दोषींना शिक्षा होईल असा माझा विश्वास आहे . या माझ्या एकाकी लढाईत आता माजी विद्यार्थी व ग्रामस्थही मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत... त्यामुळे या सर्वांच्या सहकार्याने, शाळेला पुनर्वैभव प्राप्त होईल असा मला विश्वास वाटतो. YOUR QUERIES Bhushan Karekar Marathi you tuber Marathi vlogger Shankar mahadev vidyalay kumbhavade Kumbhavade high school Deelip karekar Shashi Sawant Arvind sawant Collector Sundhudurg Shikshak bharti Corruption Bhrashtachar #bhushankarekar #marathidailyvlog #marathiyoutuber #kumbhavadehighschool #shankarmahadevvidylay #deelipkarekar #shashisawant #arvindsawant #shikshansanchalk #udaysamant #vaibhavnaik #collectorsindhudurg #corruption #shikshakbharti