Перейти к содержимому

E05. गणपती विसर्जन । लाडका लंबोदर । Ganpati visarjan 2026

The Marathi Backpacker

0:00 / 0:00

E05. गणपती विसर्जन । लाडका लंबोदर । Ganpati visarjan 2026

843 просмотра · 7 дн. назад
The Marathi Backpacker
792 подписчика
843 просмотра · 7 дн. назад
घरी मोठा गणपती घेऊन आलो पण त्याला विसर्जनसाठी कसा घेऊन जायचा हा मोठा प्रश्न घरच्यांना पडला होता. विसर्जनच्या आदल्या दिवशी मी आणि नयन गाडी घेऊन चिपळूण मार्केटला गेलो. नर्सरीवाल्याकडे हातगाडी होती. त्याने ती घेऊन जा असं सांगून दुसऱ्या दिवशी आणून द्या असं सांगितलं. गाडी मिळाली हा आनंद होताच पण चिपळूण ते पोसरे गावात हातगाडी कशी घेऊन जायची हा मोठा प्रश्न पडला.मग आम्ही बाजूला असलेल्या टेम्पो ला विचार तर ते काका १६०० रु. येऊन जाऊन होतील असं सांगितलं. आम्ही शेवटी १४०० रु. मध्ये डन केलं आणि दुसऱ्या दिवशी हातगाडी घेऊन आलो. दुपार नंतर लंबोदराची शेवटची आरती झाली आणि ५.३० वाजता विसर्जनसाठी गणपती बाहेर काढला. खूप धमाल आली. वाजत गाजत लंबोदर नदीवर ६.३० वाजेपर्यंत पोहचला आणि सूर्यास्ताच्या वेळेवर तो पाण्यामध्ये विसर्जन झाला. मन नाराज झालं असलं तरी चेहऱ्यावर थोडा आनंद होता.त्याने केलेला हमरापूर ते माझं घर हा प्रवास जवळपास ४ महिन्याचा होता. तो घरी आनंदाने आला ५ दिवस. हौस,मजा,मस्ती,धमाल बघितली आणि आता तो त्याच्या घरी जाण्यासाठी निघाला होता, पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी. भेटू , पुढच्या वर्षी असं सांगून तो पाण्यात विसर्जन झाला.