अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंची एन्ट्री | जुनी पेन्शन, शिक्षकांचे प्रश्न आणि २३ ऑक्टोबरची लढत
CITY NEWS Marathi
0:00 / 0:00
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंची एन्ट्री | जुनी पेन्शन, शिक्षकांचे प्रश्न आणि २३ ऑक्टोबरची लढत
9 просмотров · 10 ч назад
CITY NEWS Marathi
29,6 тыс. подписчиков
9 просмотров · 10 ч назад
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार श्री. दिलीप कडू यांच्याशी सिटी न्यूजने खास संवाद साधला.
या मुलाखतीत दिलीप कडू यांनी ३५ वर्षांच्या संघटनात्मक कामाचा प्रवास, निवडणूक लढवण्यामागची भूमिका, जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती, ग्रामीण भागातील शाळांची परिस्थिती, सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षकांचे प्रश्न, निवड श्रेणी, आश्वासित प्रगती योजना आणि आठवा वेतन आयोग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली.
शिक्षक मतदारसंघात राजकीय पक्षांपेक्षा शिक्षक संघटनांची भूमिका किती महत्त्वाची आहे? संजय खोडके यांची भूमिका काय? महायुतीच्या राजकारणाचा या निवडणुकीवर काय परिणाम होणार? आणि शिक्षकांनी दिलीप कडू यांनाच मतदान का करावे? या सर्व प्रश्नांवर दिलीप कडू यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.
अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक २३ ऑक्टोबरला होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.
ही संपूर्ण मुलाखत पाहा आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवरील दिलीप कडू यांची भूमिका जाणून घ्या.
सिटी न्यूजला Subscribe करा, Video Like करा आणि जास्तीत जास्त Share करा.
#DilipKadu #AmravatiTeacherConstituency #TeachersElection
#VidarbhaMadhyamikShikshakSangh #citynews_amravati