Перейти к содержимому

Kajwa Mohotsav Bhandardara 2021 | Fireflies Festival | Motovlog | Marathi Vlog | Marathi Youtuber

Zunzarmachi

0:00 / 0:00

Kajwa Mohotsav Bhandardara 2021 | Fireflies Festival | Motovlog | Marathi Vlog | Marathi Youtuber

1 763 просмотра · 5 л. назад
Zunzarmachi
35,6 тыс. подписчиков
1 763 просмотра · 5 л. назад
#fireflies #kajavamohotsav #kajwamohotsav #bhandardara #firefliesfestival चिखल घाम आणी सह्याद्री ! #sahyadryoffroad #MarathiVlog #MarathiYoutuber प्रकाश-शलाखा- भंडारदर्‍याचा काजवा मोहोत्सव 2021 ! वैशाख वणवा आपल्या अस्तित्वाचा दाखला पाना-फुलांवर, दगड धोंड्यांवर, पाला पाचोळ्यावर इतकेच काय तर गुरा-वासरांसहीत माणसाच्या चेहर्‍यावरही देत असतो. निसर्गाच्या प्रत्तेक घटकाला माहीत असतं, रात्री नंतर दिवस उजाडणारच आहे, फक्त रात्रीचा अंधार जायची वाट पहायची आहे. आपली सहनशीलता उजाडेपर्यंत शाबूत ठेवायची आहे. वैशाख वणव्यानंतरच जेष्ठातल्या पावसाळ्याचे आगमन होणार, त्यासाठी सृष्टी झपाटल्यासारखी पावसाची वाट पाहात असते. येणारा पाऊस आपल्या सोबत पाण्याबरोबरच उत्साह, आनंद आपल्याला मुक्तहस्ते भरभरून देणार असतो. झाडांच्या पानांवर साचलेली निराशेची धूळ एका क्षणात झटकून त्यांना नवाकोरा हिरवा शालू भेट देणार असतो. निसर्गातला जिवंतपणा, पक्षांच्या किलबिलाटासहित त्याच्या स्वछंदी बागडण्यातून सर्वत्र मोकळा आनंदी, ऊत्स्फूर्त जिवंतपणा भरून टाकणार असतो. निसर्गाला या येणार्‍या सृष्टीतल्या बदलाची जाणीव होते. त्यातील प्रत्तेक घटक येणार्‍या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपआपल्या परीने त्याच्या स्वागताची तयारी करत असतो. असाच एक चमत्कार सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये, रानावनात घडत असतो. ज्यावेळी आपण निद्राधीन असतो त्याचवेळी नभोमंडल जमीनीवर पांनाफुलांमध्ये अवतरलेलं असतं. वैशाख महिन्याच्या शेवटाला रात्रीच्या अंधारात काजव्यांचा थरार सुरू होतो. जुंगलात दमटजागी, पाण्याच्या जवळपास हजारो, लाखो किंवा कोट्यवधी काजवे जमा होतात. लहानपणी शेतामध्ये काजव्यांचा मागून धावताना कित्तेक तास घालवलेत. तेव्हा एकटेदुकटे दिसणारे काजवे अखाद्या चहाच्या कपात पकडून गोळाकरायचे, कपावर उपरण्याचा एकपदरी पडदा बांधला की झाली तयार आमची वीजेरी. किती वेळा आणि किती वर्ष हा खेळलो असेल आता आठवत नाही. लहान पणी जेव्हडे काजवे दिसायचे तेव्हडेही काजवे आता गावी दिसत नाहीत, याची खंत असायची मनात. बारा वर्षापूर्वी रात्री दुचाकीवरून गावी जाताना अचानक माला शोध लागला भंडारदर्‍याच्या काजवा मोहोत्सवाचा. तेव्हापासून प्रत्तेक वर्षी हा काजवा मोहोत्सव पहाण्यासाठी भंडारदर्‍याला जाणे होते. वैशाखसरताना भंडारदर्‍याच्या हवेतच बदल होत नाही तर निसर्गही कात टाकतो. चोहोबाजूंना मिट्टकाळोख पसरलेला असतो आणि काजव्यांच्या प्रकाश शलाखा रस्त्यावरून, झाडांवरून खाली दारीतून डोंगरावरून लुकलुकत असतात. भंडारदर्‍याच्या आदिवासी भागात अजूनही निसर्ग त्याच्या मूळ रूपात शाबूत आहे. ग्रीष्माच्या शेवटी आणि पावसाच्या सुरूवातीला इथल्या डोंगरदर्‍यांमद्धे काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. रस्त्याच्या दुतर्फा काही विशीष्ठ झाडांवरच काजव्यांचा लयबद्ध चमचमाट चालू असतो. ही काजव्यांची वाढती संख्या येणार्‍या पावसाची वर्दी देतात. त्यांच्या संखेवरून निसर्गत:च येणार्‍या पावसाच्या तीव्रतेची कल्पनाही करता येते. वातावरणातील दमटपणा आणि आद्रता जशी जशी वाढत जाते तशी तशी काजव्यांची संख्या वाढत जाते. जणूकाही सर्व नभोमंडळ जमीनीवर अवतीर्ण झाल्याचा स्वर्गीय अनुभव येतो. गाडीचे दिवे बंद करून फक्त यारस्त्यांवर मनसोक्त भटकायचे. या अग्निशिखा कधी तुमच्या डोक्यावरुन तर कधी आजुबाजुने स्वछंदपणे बागडत असतात. भान हरपून तुम्ही रात्रभर नुस्ते निशब्द फिरत असता आणी मनमुराद ही जमीनीवरची लोभसवाणी प्रकाशफुलं वेचत असता. हा अनुभव खरच मंत्रमुग्ध करणारा आहे. हा स्वर्गीय आनंद प्रत्तेकाने घ्यायलाच हवा. एकालयीत, तालासूरात निशब्द लुकलुकाट तुमच्या चोहोबाजूला चाललेला असतो, आपण त्याचे मुक साक्षीदार बनलेले असतो. गाडीचे दिवे उघडझाप करून पहा, हे काजव्यांचे दिवेही दिव्याच्या उघडझापीला त्यांच्या चमचमाटाने उत्तर देतात आणि तोही एका तालासुरात, फक्त तुम्हाला तो ताल-सुर कानाऐवजी तुमच्या नजरेने टिपता यायला हवा.अंधार्‍या रात्री गाडीचे दिवे बंद करून अकटेच या झगमगीत रस्त्यावरून रोंयल सफर करून बघा, तुम्ही कुणी स्पेशल असल्याचा अनुभव नक्कीच येणार. दुतर्फा नैसर्गिक दिव्यांचा झगमगाट आणी मधून आपली सवारी चालली आहे. एखाद्या परी कथेतील वर्णन ना!. भंडारदर्‍याच्या परिसरात अनेक किल्ले आहेत रात्रीत काजवयांच्या संगतीत आखादा ट्रेक तर करायलाच हवा. सात सात वर्षापूर्वी असाच हरिश्चंद्रगड उतरलो होतो काजव्यानसोबत, अप्रतिम अनुभव होता तो. पण हे काजवे कॅमेर्‍यात बंदिस्त करणे हे महा कर्म कठीण काम. Original Write-up from my Blog https://ran-kida.blogspot.com/search/... I wish you a wonderful day and ....... I will meet you on Instagram ►   / ran_kida   ---------------------------------------------------------------------------------------------------