करूया ही आरती बाप्पा मोरयाला | नवीन आरती | Ganapati Arati 2025 | Mayur Gurav | use headphones
Mayur Gurav
0:00 / 0:00
करूया ही आरती बाप्पा मोरयाला | नवीन आरती | Ganapati Arati 2025 | Mayur Gurav | use headphones
17 869 просмотров · 11 месяцев назад
Mayur Gurav
904 подписчика
17 869 просмотров · 11 месяцев назад
🙏 करूया ही आरती बाप्पा मोरयाला | सुख देणाऱ्या पार्वतीनंदनाला
गणपती बाप्पाची नवीन आरती 2025 🙏
मयुर गुरव लिखित एक नवीन आणि सुरेल आरती – “करूया ही आरती बाप्पा मोरयाला” 🎶✨
आपल्या घराघरात, मंडळामध्ये किंवा कुटुंबासोबत हीआरती करून बाप्पाच्या चरणी भक्तीभाव व्यक्त करा.
📍लेखक आणि सादरकर्ते – Mayur Gurav
📍 वर्ष – 2025
अश्याच नवीन नवीन आणि सुंदर आरत्या तुम्हाला पाहिजे असतील तर channel ला नक्की subscribe करा, like करा, share करा.
Use headphone
🌸 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया! 🌸
|| करूया ही आरती || बाप्पा मोरयाला ||
चाल : "और इस दिल में क्या रखा है”
मयुर गुरव
करूया ही आरती | बाप्पा मोरयाला ||
सुख देणाऱ्या | पार्वती नंदनाला || धृ ||
लहानथोर आली | तुला पाहण्याला ||
सुख देणाऱ्या पार्वती नंदनाला || १ ||
तुझीया कृपेने | जीवन फुलून गेले ||
घर प्रकाशले | मन आनंदी झाले ||
क्षणिक सुखासाठी | मन माझे धडपडले ||
तुझे बळ मला | देवा न कळले ||
दुर्वा-तूर्ण आत्मीयतेने मान दिला पहिला |
तुला मान दिला पहिला ||
करूया ही आरती | बाप्पा मोरयाला ||
सुख देणाऱ्या | पार्वती नंदनाला || २ ||
प्रतिक्षा मी करी | जसा मेघाची मयूर ||
सुखी संसार माझा | देवा कर साकार ||
दयावाण तू | करुणा सागर तू ||
तार मला वा मार | एक आधार तू ||
क्षरण आलो आम्ही देवा । तुझीया चरणाला ||
देवा तुझीया चरणाला ||
करूया ही आरती | बाप्पा मोरयाला ||
सुख देणाऱ्या | पार्वती नंदनाला || ३ ||
देवा हे गणराया | मागणे तुझीया पाया ||
सर्वांचे भले कर | कल्याण रक्षण कर ||
राहो देवा गोड तुझे नाम | आमच्या मुखाला ||
देवा आमच्या मुखाला ||
करूया ही आरती | बाप्पा मोरयाला ||
सुख देणाऱ्या पार्वती नंदनाला || ४ ||
#Ganpati2025 #Aarti #GanpatiBappaMorya #MayurGurav #GanpatiArati
#ganeshchaturthi #ganapatiaarti #viralreels