💙 भिम विचारांचा उजेड -Official video | Sachin Bhuigal | Charan Jadhav | | New Marathi Bheemgeet 2026
Sachin Bhuigal
0:00 / 0:00
💙 भिम विचारांचा उजेड -Official video | Sachin Bhuigal | Charan Jadhav | | New Marathi Bheemgeet 2026
5 980 просмотров · 2 месяца назад
Sachin Bhuigal
3,04 тыс. подписчиков
5 980 просмотров · 2 месяца назад
💙 भिम विचारांचा उजेड – Official Song
समता, न्याय आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित हे नवीन मराठी भीमगीत आणि राज्यात चालू असलेल्या अनुसूचित जाती उपवर्गीकरण सारख्या ज्वलंत विषयावर भाष्य करणारं गीत
गीतकार : शाहीर चरण भीमराव जाधव
गायक : सचिन प्रल्हाद भुईगळ
🎤 You tue channel: Sachin Bhuigal
🙏व्हिडिओ आवडल्यास Like करा, Comment करा, Share करा आणि Sachin Bhuigal चॅनेलला Subscribe करून Bell Icon दाबा.
अंधाराच्या डोळ्यात ईतिहास कोरतो गा
भीम विचाराचा उजेड गावोगावी पेरतो गा -//धृ//
शाळा नव्हती शिकाया
होतं उघडंच अंग
होतं दुस्वार जिणं
नव्हता जगण्याला ढंग
भीम विचाराने आता आम्ही मनू घेरतो गा...
जाता मंदिरात इथं होई छिन्न छिन्न अंग
भीम लढला म्हणून आला जगण्याला रंग
नको भटकूस आता स्वतः ला भागतो का...
दूख सार्या जलमाच पिढी भोगून गा गेली
अशी करणी भीमाची पिडा टळून गा गेली
तोलामोलाचं हे जीणं, तोंड कसं फेरतो गा
मोड सारे सवतेसूभे मोट एकीची रं बांधा
चल जागवू माणसे लाव खांद्याला रं खांदा
उठ जाग चरण बाळा दिवसा तू घोरतो गा...