Перейти к содержимому

Pune Graduate Constituency : भाजपने डॉ. स्मिता जाधव यांनी तिकीट का दिले? | Satej Patil | Kolhapur

Mumbai Tak

0:00 / 0:00

Pune Graduate Constituency : भाजपने डॉ. स्मिता जाधव यांनी तिकीट का दिले? | Satej Patil | Kolhapur

20 815 просмотров · 2 дн. назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
20 815 просмотров · 2 дн. назад
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे राजकीय धक्कातंत्र वापरले आहे. भाजपच्या सर्व मातब्बर इच्छुकांना डावलून पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता योगेश जाधव यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, डॉ. स्मिता या काँग्रेसचे नेते आणि फडणवीसांचे कट्टर राजकीय विरोधक सतेज (बंटी) पाटील यांच्या सख्या भाची आहेत. या उमेदवारीमुळे बंटी पाटलांची मोठी राजकीय कोंडी झाली असून, हा फडणवीसांचा 'कोल्हापूर मास्टरस्ट्रोक' मानला जात आहे. कोल्हापूरचे तब्बल ९१ हजार मतदार, डी. वाय. पाटील समूहाचे संस्थात्मक जाळे आणि 'पुढारी' माध्यम समूहाचे पाठबळ यामुळे ही निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हर्षदा देशमुख-जाधव रिंगणात असल्याने दोन उच्चशिक्षित महिला नेत्यांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे. फडणवीसांचा हा डाव यशस्वी होणार की भाजपला बंडखोरीचा फटका बसणार? या निवडणुकीचे सखोल राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. In a major political surprise, Chief Minister Devendra Fadnavis has fielded Dr. Smita Yogesh Jadhav as the BJP candidate for the Pune Graduate Constituency election. Bypassing several established aspirants, this move is being seen as a masterstroke to corner Congress leader Satej (Bunty) Patil, as Dr. Smita is his own niece. Dr. Smita, the Pro-Vice-Chancellor of Dr. D. Y. Patil Vidyapeeth in Pimpri, brings significant institutional backing and the strong media network of the 'Pudhari' group from Kolhapur. With Kolhapur accounting for the highest number of registered graduate voters (over 91,000), this election has turned into a high-stakes battle. She will face NCP (SP) candidate Harshada Deshmukh, daughter of former divisional commissioner Prabhakar Deshmukh, setting the stage for a fierce contest between two highly educated women leaders. Watch this video for a deep political analysis of Fadnavis's strategy and the upcoming Pune Graduate Constituency election. #PuneGraduateConstituency #SmitaJadhav #DevendraFadnavis #SatejPatil #BJP #NCP #HarshadaDeshmukh #MaharashtraPolitics #PuneNews #KolhapurNews 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.