Перейти к содержимому

Shivendraraje Bhosale | मारहाण झालेल्या शेतकऱ्यावर विनयभंगाचा, तुषार खरातांवर ट्रेस पासिंगचा गुन्हा

Lay Bhari News

0:00 / 0:00

Shivendraraje Bhosale | मारहाण झालेल्या शेतकऱ्यावर विनयभंगाचा, तुषार खरातांवर ट्रेस पासिंगचा गुन्हा

9 199 просмотров · 6 ч назад
Lay Bhari News
135 тыс. подписчиков
9 199 просмотров · 6 ч назад
#shivendrarajebhosale #डबेवाडी #सातारा #समीरमाने #तुषारखरात #सागरदेवरे #चेतनपवार #शेतकरीन्याय #पत्रकारितेवरीलहल्ला #पत्रकारस्वातंत्र्य #पोलीसप्रशासन #सातारा_पोलीस #गुंडशाही #लँडमाफिया #संविधान #लोकशाही #लयभारी #LayBhariNews साताऱ्यात गुंडशाहीचा कळस! शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई नाही; उलट शेतकऱ्यावर विनयभंगाचा आणि पत्रकार तुषार खरात यांच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा! छत्रपतींच्या राजधानीत नेमकं चाललंय तरी काय? काल डबेवाडी येथे वार्तांकनासाठी गेलेल्या 'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांना वार्तांकन करण्यास अडथळा निर्माण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला. याचवेळी समीर माने या शेतकऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. लँड माफिया म्हणून आरोप होत असलेला सागर देवरे आणि चेतन पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्रातून होत असताना पोलिसांनी मात्र वेगळीच कारवाई केली. मारहाण झालेल्या शेतकऱ्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर पत्रकार तुषार खरात यांच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण कारवाईमागे साताऱ्यातील एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपाध्यक्षाचा दबाव असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. सत्ता, पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का? शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा अधिकार नाही का? पत्रकारांना सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याची मुभा नाही का? या प्रकरणातील काही महत्त्वाचे प्रश्न : समीर माने यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई का नाही? शेतकऱ्यावरच विनयभंगाचा गुन्हा कसा दाखल झाला? पत्रकार तुषार खरात यांच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा कोणाच्या दबावातून दाखल झाला? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपाध्यक्षाची या प्रकरणात नेमकी भूमिका काय? सातारा पोलिसांकडून निष्पक्ष तपास होणार का? लोकशाही, संविधान आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ही कसोटी आहे. गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारच! पाहा 'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांचा विशेष रिपोर्ट. लय भारी – खमकी भूमिका, खणखणीत आवाज! टीप : या रिपोर्टमध्ये नमूद केलेले आरोप संबंधित व्यक्तींच्या दाव्यांवर आधारित आहेत. त्यांची स्वतंत्र पडताळणी व संबंधितांची बाजू जाणून घेणे आवश्यक आहे. दोष सिद्ध होईपर्यंत कोणालाही दोषी मानता येणार नाही.