रंगपंढरी Face-to-Face: Alok Rajwade - Part 1
रंगपंढरी / Rang Pandhari
0:00 / 0:00
रंगपंढरी Face-to-Face: Alok Rajwade - Part 1
41 934 просмотра · 5 л. назад
रंगपंढरी / Rang Pandhari
21,4 тыс. подписчиков
41 934 просмотра · 5 л. назад
"नाटकातले कलाकार, नेपथ्यातली प्रत्येक वस्तू, प्रकाश, संगीत... हे सर्व प्रेक्षकांचं देणं लागतात. नुसतं आलं आणि गेलं असं काहीच नसावं. प्रत्येक गोष्टीने स्वतःचं असं काही म्हणणं घेऊन यावं, ते मांडावं आणि मगंच जावं."
आलोक राजवाडे
'रंगपंढरी' चा नवा सीझन विचार आणि प्रक्रियेत विलक्षण नवेपणा असलेल्या आलोक सारख्या तरुण, प्रतिभावान दिग्दर्शकाने करावा हे आम्हाला समर्पक वाटलं.
'दोन शूर', 'गेली एकवीस वर्षं', 'शिवचरित्र आणि एक', 'बिनकामाचे संवाद', 'सिंधू, सुधाकर, रम आणि इतर', 'A Doubtful Gaze at Uber in the Midnight', 'नाटक नको', 'मी गालिब', 'तिची सतरा प्रकरणे' अशी अनेकविध विचारांची आणि धाटणीची नाटकं बसवणारा मराठी रंगभूमीवरचा तरुण, गुणी आणि प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून आलोक ओळखला जातो.
संहितेपासून प्रयोगापर्यंत नाटक उभं करण्याचे सर्व पारंपरिक ठोकताळे मोडीत काढत एखाद्या मनस्वी आणि उत्स्फूर्त चित्रकारासारखा आलोक नाटकाला सामोरा जातो. त्याच्या दिग्दर्शन प्रक्रियेत जेवढी अनिश्चितता आहे तेवढीच काव्यात्मकता आणि दृश्यात्मकता सुद्धा आहे.
सर्व टीमला बरोबर घेऊन शक्याशक्यतेचे सर्व कंगोरे अथकपणे धुंडाळावे, आणि मग ह्यातून साकार झालेला एक रसरशीत, नवेपणा असलेला प्रयोग प्रेक्षकांना अनुभवायला द्यावा ह्यासाठी आलोक सर्व पणाला लावतो.
आजच्या भागात ऐकूया ह्या नव्या दमाच्या आणि असामान्य दृष्टीच्या दिग्दर्शकाच्या प्रक्रियेविषयी.