ओल्या नारळाची करंजी | 3 खास टिप्स व संपेपर्यंत खुसखुशीत | 91 वर्षांच्या आजीची करामत
COOK without a BOOK by Varsha
0:00 / 0:00
ओल्या नारळाची करंजी | 3 खास टिप्स व संपेपर्यंत खुसखुशीत | 91 वर्षांच्या आजीची करामत
28 479 просмотров · 6 дн. назад
COOK without a BOOK by Varsha
13,9 тыс. подписчиков
28 479 просмотров · 6 дн. назад
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिवाळी सुख, समाधान आणि आनंदाने भरलेली जावो.
आई-आजीच्या पद्धतीची खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी |
ओल्या नारळाची करंजी अशी बनवा, कव्हर शेवटपर्यंत कुरकुरीत राहील
दिवाळी फराळासाठी परफेक्ट करंजी |15 करंज्या अगदी परफेक्ट मापात |
करंजी तेलकट होणार नाही आणि कव्हर फुटणार नाही | सोपी रेसिपी
---------------------------------------------------------------------------------------------------------------
करंजी एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आवरणाची आणि लुसलुशीत ओल्या नारळाच्या सारणाची! आज आपण बनवणार आहोत पारंपरिक ओल्या ताज्या नारळाची करंजी, जी तळल्यानंतर सोनेरी आणि अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत राहते.योग्य माप आणि पद्धत वापल्यामुळे करंजी तेल कमी पिते, तळताना फुटत नाही आणि सारण बाहेर येत नाही.
ही पारंपरिक करंजी दिवाळी फराळासाठी, नैवेद्यासाठी किंवा कोणत्याही सणासाठी नक्की करून पाहा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
व्हिडिओ आवडला तर Share आणि Subscribe करायला विसरू नका!
आणि 🔔सर्व नवीन रेसिपीसाठी Bell Icon दाबा
👍 Video आवडली तर Like करा
💬 Comment मध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा.
****📧 Business Inquiries: dharapvarsha@gmail.com
*YouTube channel चॅनेल सबस्क्राइब करा:[चॅनेल लिंक]:
/ @cookwithoutabookbyvarsha414
*FaceBook फेसबुक लिंक:
/ 1efkjofxmx
*Instagram इंन्स्टाग्रॅम लिंक :
/ varshadharap
Follow me on YouTube, Instagram and Facebook.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवाळी फराळाचे आपल्या चॅनलवर पोस्ट झालेले पदार्थ
1) खमंग काटेरी खुसखुशीत चकली
• चकली - टेन्शन नको.भाजणी सकट खमंग खुसखुशीत ...
2) चकलीची झटपट धान्य भाजणी
• टेन्शन आलय? चकली भाजणी झाली नाही? Don't wo...
3) खुटखुटीत दाणेदार बेसन चूरमा लाडू
• खुटखुटीत, दाणेदार साजुक तुपातले झटपट बनणार...
4) मखमली बेसन लाडू
• बेसन लाडू - Besan ladoo- म्हटल तर दाणेदार ...
5) गुलाबाच्या सुगंधाचे गुलाब चिरोटे
• 14 पदरी गुलाबाचे चिरोटे ओठांनी खाता येतील ...
6) हलके फुलके जाळीदार आनरसे
• Anarase #अनारसे. Step by step guide for Cr...
7) खमंच चुरचुरीत पोह्यांचा चिवडा
• पोह्याचा कुरकुरीत चिवडा आजीच्या हातचा. दिल...
8) चटकदार मसाला शेव मसाल्या सकट
• दिवाळी स्पेशल 'मसाला शेव' - बेसनाचा चिकट ब...
9)कणकेचे अनेक पापुद्रेवाले खुसखुशीत शंकरपाळे
• कणकेचे अनेक पापुद्रेवाले मसाला शंकरपाळे / ...
10) मैद्याचे गोड शंकरपाळे
• #शंकरपाळे - #दिवाळी फराळ, टम्म फुगलेले, ल...
11)कणकेचे गोड शंकरपाळे
• #Shakkarpare atte ke.अनेक परतोवाले,खमंग,खस...
12) मऊसूद रवा नारळ लाडू
• रवा नारळ लाडू.खमंग,खुटखुटीत, मऊसूत.पाक बिघ...
—-——————-———————————––—————
साहित्य
कव्हरसाठी
मैदा: 100 ग्रॅम किंवा 1 वाटी
बारीक रवा: 50 ग्रॅम किंवा अर्धी वाटी
तांदळाचं पीठ: 1 टेबलस्पून
पिठीसाखर: 1 टेबलस्पून
घट्ट तूप: 1 टेबलस्पून, कडकडीत गरम करुन
मीठ: चिमूटभर
थंड पाणी: गरजेनुसार
*****
ओल्या नारळाच्या सारणासाठी
ताजा ओला नारळ: 2 वाट्या
साखर: पाऊण वाटी
खसखस: आवडीनुसार
चारोळी: ऐच्छिक
बेदाणे: ऐच्छिक
वेलदोड्याची पूड: शेवटी
दिलेल्या मापात साधारण 15 करंज्या तयार होतात.
INGREDIENTS : For the outer shell (cover):
All-purpose flour (maida): 100 grams or 1 cup
Fine semolina (rava): 50 grams or ½ cup
Rice flour: 1 tablespoon
Powdered sugar: 1 tablespoon
Ghee (solid/thick): 1 tablespoon, heated until piping hot
Salt: A pinch
Cold water: As needed
****
INGREDIENTS For the fresh coconut filling
Freshly grated coconut: 2 cups
Sugar: ¾ cup
Poppy seeds (khas-khas): To taste
Chironji (charoli): Optional
Raisins: Optional
Cardamom powder: 1/2 tsp To be added at the end
These measurements will yield approximately 15 karanji (sweet dumplings).
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
*** करंजी खुसखुशीत होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
मैद्यामध्ये रव्याबरोबर तांदळाचं पीठ नक्की घाला.
तूप कडकडीत गरम करून पिठात घाला व चांगलं चोळून घ्या.
कव्हरचं पिठ भिजवताना थंडगार पाणी वापरा.
पीठ पुरीच्या कणकेएवढ घट्ट भिजवा.
पीठ कमीत कमी अर्धा तास झाकून मुरू द्या.
लाटताना पिठी वापरू नका. गरज असल्यास पोळपाटाला थोडं तेल लावा.
सारण पूर्णपणे गार झाल्यानंतर त्यातील गोळे मोडून घ्या.
करंजीच्या कडा घट्ट बंद करा, नाहीतर तळताना सारण बाहेर येऊ शकतं.
मध्यम ते मंद आचेवर करंज्या सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळा.
तळलेल्या करंज्या पूर्ण गार झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Video Chapters
00:00 खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंजीची ओळख
00:39 दिवाळी फराळाची सुरुवात आणि करंजीची परंपरा
02:13 करंजीच्या कव्हरचं पीठ भिजवणे 02:39 ओल्या नारळाचं सारण बनवणे 04:19 पीठ मळणे आणि लाट्या तयार करणे
05:09 करंजीचं कव्हर खुसखुशीत होण्याचं गुपित
05:15 मैदा, रवा आणि तांदळाच्या पिठाचं प्रमाण
06:06 तूप, पिठीसाखर आणि थंड पाण्याचा उपयोग
07:19 करंजी लाटण्याची योग्य पद्धत 07:52 सारण भरणे आणि करंजी बंद करणे
08:52 उरलेल्या पिठाचा मोदक
09:18 करंज्या तळण्यासाठी तेलाचं योग्य तापमान
09:35 करंज्या तळण्याची पद्धत
09:52 खुसखुशीत ओल्या नारळाच्या करंज्या तयार
10:15 करंजीची चव आणि कुरकुरीतपणा
10:40 आईची शाबासकी आणि रेसिपीचा शेवट
#ओल्यानारळाचीकरंजी #करंजीरेसिपी #दिवाळीफराळ #KaranjiRecipe #coconutKaranji #diwaliFaral #मराठीरेसिपी #दिवाळीरेसिपी #खुसखुशीतकरंजी #घरगुतीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #deepavalifaralRecipe