Перейти к содержимому

# साजूक तुपामध्ये केलेला, तोंडात विरघळणारा मैसूर पाक#

My Routine life

0:00 / 0:00

# साजूक तुपामध्ये केलेला, तोंडात विरघळणारा मैसूर पाक#

119 просмотров · 2 недели назад
My Routine life
110 подписчиков
119 просмотров · 2 недели назад
फक्त 15 मिनिटात तयार होणारा साजूक तुपातला मैसूर पाक बनवण्यासाठी एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी मैदा, चाळून घ्यायचा. वाटीने दीड वाटी तूप मापून घेऊन , त्यामध्ये चाळलेले पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं. थंडच तूपामध्ये पेट मिक्स करून घ्यायचं. साखरेचा पाक बनवण्यासाठी दोन वाट्या साखर एक वाटी पाणी. एकतारी पाक करून द्यायचा व्हिडिओमध्ये दाखवलाय तसा. पाक तयार झाल्यानंतर , तुपामध्ये घोळले बेसनचे पीठ घालून घ्यायचं. पाक तयार झाल्यानंतर गॅस बंद करून घालायच आहे पीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस चालू करायचा. दुसरीकडे दोन वाट्या तूप गरम करायला ठेवायचं. बेसना उकळी आली नंतर, गरम झालेलं तूप हळूहळू पळीने त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. थोडं थोडं तूप घालून घ्यायचं म्हणजे चांगलं बेसन भाजला जाईल. जोपर्यंत पीठ तूप सोडत नाही तोपर्यंत घालून घ्यायचं. ट्रेला तूप लावून ठेऊन घ्यायचं. मिश्रण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आळल्यानंतर बाजूला तूप सोडलं की ते मिश्रण ट्रेमध्ये काढून घ्यायचं. गरम असतानाच नीट पसरून घ्यायचं. एक ते दोन मिनिट झाल्यानंतर वड्या कापून घ्यायच्या नाहीतर थंड झाल्यानंतर त्या कापल्या जात नाहीत. गार झाल्यानंतर वड्या बाहेर काढून घ्यायच्या.