Ganpati Pranpratishtha Puja 2025
Date Panchang
0:00 / 0:00
Ganpati Pranpratishtha Puja 2025
13 105 просмотров · 1 год назад
Date Panchang
5,78 тыс. подписчиков
13 105 просмотров · 1 год назад
महाराष्ट्रात घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा होते. मात्र अनेकांना पूजा सांगण्यासाठी गुरुजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा प्रसंगी हा विडिओ पाहून विघ्नहर्त्या गणेशाचे प्रतिवर्षी प्रमाणे पूजन या ही वर्षी करता यावे याकरिता आम्ही आमच्या YouTube Channel वरून आणि Social Media Handles वरून गणेश पूजन विधी चा विडिओ शेअर करणार आहोत. ही गणेश पूजा ऐकून आपण घरातील गणेशाचे मनोभावे पूजन करू शकाल.
गणेशाचे पूजन हे त्यानंतर दक्षिणा दिल्यावर खऱ्या अर्थाने पूर्ण होते त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजन झाल्यावर प्रतिवर्षी प्रमाणे दक्षिणा काढून ठेवावी आणि जे गुरुजी आपल्या घरी दरवर्षी पूजनाला येतात त्यांच्या घरी नेऊन द्यावी अथवा Online Transfer करावी. तसेच आमच्या dinank.datepanchang.in या WebApp वरून देखील आपण Donation / दक्षिणा देऊ शकता. या दक्षिणेचा उपयोग अशाच प्रकारचा Content उपलब्ध करून देण्यासाठी केला जाईल.
श्रीगणेशाच्या पूजनापूर्वी खाली दिलेले सर्व साहित्य हाताशी घेऊन बसावे.
श्रीगणेश चतुर्थी - पूजन साहित्य
हळद - कुंकु
अष्टगंध - शेंदूर
उगाळलेले गंध - चंदन
कापसाची वस्त्र (कापसाची माळ)
पत्री – विविध झाडांची पानं
हार - फुलं (काही लाल रंगाची फुलं असावीत)
दूर्वा - आघाडा - शमी - तुळस
अक्षता
विड्याची पाने - १५, सुपारी - १० (पांढरी)
खारीक - बदाम - खोबरे - गुळाचा खडा
पंचामृत
अत्तर
जानवं
नारळ - १
नैवेद्य (मुख्य नैवेद्य, मोदक, पेढे, इ.)
पंचखाद्य
एक रुपयाची नाणी - ५/६
ताम्हन - २, पळी - २, तांब्या
आसन / पाट - २
पाणी टाकण्यासाठी पातेलं
visit us - www.datepanchang.com
Like - facebook.com/DatePanchang
WhatsApp - https://wa.me/919075025309
Tweet - twitter.com/DatePanchang
Insta - Date Panchang
Telegram - https://t.me/datepanchang
WebApp - dinank.datepanchang.in