Mirgad and Sankshi Fort ( मिरगड आणि सांकशी )
Premal Bhoir
0:00 / 0:00
Mirgad and Sankshi Fort ( मिरगड आणि सांकशी )
1 175 просмотров · 1 г. назад
Premal Bhoir
190 подписчиков
1 175 просмотров · 1 г. назад
मिरगड - पेण शहराजवळ मिरागड हा कोणतेही अवशेष नसलेला किल्ला आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर होता. तो डोंगर, मिर्या डोंगर ह्या नावाने प्रसिध्द आहे. या डोंगराचे स्थान पाहाता मिरगडचा उपयोग टेहळणीसाठी (वॉच टॉवर) केला गेला असावा. इ.स १६६२ मध्ये मोगल सरदार नामदारखान याने पेण व आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला होता. तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी भाग घेतला होता. ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख आढळतो. मिरगड हा सोनगिर या नावानेही ओळखला जातो.
सांकशी गड - रायगड जिल्ह्यातील पेण गावापासून १० किमीवर सांकशी नावाचा एक छोटासा किल्ला आहे. किल्ल्यावर चढ्ण्यासाठी पार करावे लागणारे दोन कातळ टप्पे व किल्ल्यावर असणारी भरपूर पण्याची टाकी यामुळे या छोटेखानी किल्ल्याची भटकंती संस्मरणीय होते. सह्याद्रीची एक डोंगररांग खंडाळा घाटाच्या अलिकडे माणिकगडाच्या पश्चिमेला पसरलेली आहे. ही रांग उत्तरेकडे पातळगंगा आणि दक्षिणेला बाळगंगा नद्यांची खोरी विभागते. यात बाळगंगा खोर्याच्या दक्षिणेला सांकशी डोंगररांग आहे
सांक राजाने हा किल्ला बांधला. त्याला जगमाता नावाची मुलगी होती. राजा कर्नाळ्याच्या लढाईत मारला गेल्यावर त्याच्या मुलीने गडावरून जीव दिला अशी दंतकथा आहे.
इ.स. १५४० मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने हा किल्ला गुजतातच्या सुलतानाकडून जिंकून घेतला. त्यानंतर गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगिजांच्या मदतीने किल्ला परत जिंकून घेतला.निजाम सैन्य परत हल्ला करण्यासाठी येत आहे, ते पाहून किल्ला पोर्तुगिजांच्या हवाली करून गुजरातच्या सुलतान निघून गेला. निजाम सैन्याच्या वारंवार होणार्या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगिजांनी सांकशी व कर्नाळा किल्ला निजामाकडून विकत घेतला.
दर्ग्याच्या बाजूने किल्ल्यावर चढायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात आपण कातळात कोरलेल्या पायर्यांपाशी पोहोचतो. पायर्यांच्या उजवीकडे कातळात खोदलेल एक दोन खांबी टाक आहे. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्यांनी जपून खाली उतरून जाव लागत. पायर्या चढुन वर आल्यावर तीन टाकी आहेत. तिथेच वरच्या भागात जगमातेची मूर्ती आहे. हे सर्व पाहून झाले की आपण एका खिंडीपाशी पोहोचतो. गडमाथ्यावर जाणारी वाट या छोट्याश्या खिंडीतून जाते. येथील पायर्या नष्ट झालेल्या आहेत. पूर्वी या ठिकाणी कातळ टप्पा चढून जावा लागात असे. आता या ठिकाणी शिडी बसवली असल्याने चढाई सोपी झालेली आहे. शिडीच्या पायथ्याशी उजवीकडे एक छोटीशी पायवाट गेलेली आहे. याठिकाणी कातळात खोदलेली पाण्याची ३ टाकी दिसतात. यांना "गाजीशाह टाके" म्हणतात. यापैकी शेवटच्या टाक्यात शिरण्यासाठी एक ३ फ़ूट x ३ फ़ूट दरवाजा कोरलेला आहे. या दरवाजाच्या चौकटीवर दोनही बाजूला किर्तीमुख कोरलेले आहेत. त्याखाली एके काळी व्दारपाल कोरलेले होते. आता फ़क्त त्याचे अवशेष दिसतात. बाजूला कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती अस्पष्ट दिसते. या टाक्याचे दोन भाग केलेले आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. टाकी पाहून आल्या मार्गाने शिडीपाशी येउन किल्ल्यावर जाता येते. किंवा टाक्यांच्या पुढी जाणार्या पायवाटेने किल्ल्यावर जाता येते. किल्ल्यावर जाणारे बहुसंख्य ट्रेकर्स शिडीमार्गे किल्ल्यावर जातात. याठिकाणी शिडीमार्गे न जाता टाक्यांपुढील पायवाटेने गेल्यास सहसा न पाहिली जाणारी टाकी आणि किल्ला कसा पाहाता येइल याबद्दल माहिती दिली आहे.
#maharashtratrekking #fortsofindia #maharashtraig #marathi #travel #travelblogger #trekking #trekker #viral_video #viralvideo