कार्तिक स्वामी यात्रा उत्सव 2025 | श्री क्षेत्र पुणतांबा #puntamba @AlakhNiranjanMS #festival
Adesh Sainath
0:00 / 0:00
कार्तिक स्वामी यात्रा उत्सव 2025 | श्री क्षेत्र पुणतांबा #puntamba @AlakhNiranjanMS #festival
587 просмотров · 11 месяцев назад
Adesh Sainath
24,8 тыс. подписчиков
587 просмотров · 11 месяцев назад
@AlakhNiranjanMS
श्री कार्तिक स्वामी मंदिर यात्रा उत्सव 2025
.
.
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणतांब्याचा उल्लेख महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक क्षेत्रांत होतो. पुणतांबा गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा नगर असे होते. असे म्हटले जाते की हे गाव राजा विक्रमादित्याची राजधानी होती. कदाचित हे एकमेव असे गाव आहे ज्या गावाला 11 वेशी आहेत. संपूर्ण गावाच्या भोवती तटबंदी होती व स्थानिक लोक असे म्हणतात की या तटबंदीवरून एक बैलगाडी जाईल अशी या तटबंदीची जाडी होती. वैदिक काळात पुणतांबा येथे गोदावरीकाठी ऋषिमुनी तप:श्चर्या करत व मोक्षप्राप्तीसाठी पुणतांबेगावी वास्तव्य करत. पुरातनकाळी हे गाव धार्मिक विधी करण्यासाठी विख्यात होते. पुण्यप्राप्ती व मोक्षप्राप्ती साठी काशीनंतर पुणतांबा हे एकमेव महत्त्वपूर्ण ठिकाण मानले जाई. पुणतांबा येथे गोदावरी दक्षिणवाहिनी होते.
तर मित्रांनो पवित्र अशा गोदावरी किनारी खूपच प्राचीन असे कार्तिक स्वामी चे मंदिर आहे.
भगवान शिवशंकराकडून वरदान मिळवून त्रैलोक्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या त्रिपुरासुराचा वध कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला झाला. भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून त्रैलोक्याला त्याच्या जाचातून मुक्त केले. म्हणून तेव्हा मोठा विजयोत्सव साजरा करण्यात आला. भगवान शिवशंकराच्या विजयाची स्मृती म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाऊ लागली. त्याच दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला. म्हणून कार्तिकेयाचीही पूजा केली जाऊ लागली. पुणतांबेगावी पुरातनकालीन कार्तिकेय मंदिर आहे. त्या मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला कृत्तिका महोत्सव साजरा केला जातो. मंदिरासमोर त्रिपूर पेटवून प्रवाहीत केले जातात. कार्तिकी (त्रिपुरारी) पौर्णिमेला मंदिरात जप-तप साधना केल्यास साधकाला फलप्राप्ती होते. त्यादिवशी मध्यरात्री नदीचे पाणी दुधासारखे पांढरे स्वच्छ होते व कार्तिकेय स्वामी त्यावेळी नदीत स्नानासाठी येतात अशी आख्यायिका आहे. मंदिरात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे. मात्र त्रिपुरारी पौर्णिमा व कृतिका नक्षत्रांवर महिलांना मंदिरात प्रवेश मिळतो व कार्तिकेय स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिकस्वामींना नारळ, मोरपीस, रूद्राक्ष, सोने, पिवळे जानवे, तीळ, मूग वाहून प्रसन्न केले जाते. कृत्तिका नक्षत्रावर मंदिरात होणाऱ्या कृत्तिका महोत्सवास लाखो भाविक कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतात.
कार्तिक स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. घडीव व कोरीव दगडाचे काम असलेल्या त्या मंदिराचा कळस पन्नास फूट उंचीचा आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. मंदिरात मध्यभागी शंकराची पिंड असून मंदिरामध्ये दक्षिणमुखी कार्तिकस्वामींची मूर्ती, उत्तरेस गणपती तर पश्चिमेस पार्वती व गंगामातेची मूर्ती आहे. मंदिराबाहेर रावणाची मूर्ती आहे तर मंदिराच्या चारही बाजूंला भगवान शंकराचे गण व मंदिराच्या उजव्या बाजूंला नवग्रहांचे मंदिर आहे.
तर तुम्ही या मंदिराला अवश्य भेट द्या व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
ओम नमो आदेश
अलख निरंजन
#navnathparayan #navnathinformation #kanifnathmaharaj #आदेश #अलख #अलखनिरंजन#hindusaint #ancienthistory #maharashtra #maharashtraculture #devotionalplaces #spritual #spritualpath #devotional #devotion #नवनाथ #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #rahuri #shirdi #maharshtra #nathsampraday #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus #sai #shirdisai #shirdisaibaba #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers #puntamba #पुणतांबा #mystery #mysterious #temple #oldtemple
#navnathparayan #navnathinformation #kanifnathmaharaj #आदेश #अलख #अलखनिरंजन#hindusaint #ancienthistory #maharashtra #maharashtraculture #devotionalplaces #spritual #spritualpath #devotional #devotion #नवनाथ #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #rahuri #shirdi #maharshtra #nathsampraday #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus #sai #shirdisai #saptshrungi #vani #सप्तशृंगी #मार्कंडेय #markandeya #markandeyapuranam #machindranath machindranath#मच्छिंद्रनाथ #shirdisaibaba #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers
#blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers #dhamori
#adbanginathmaharaj #dhamori #gorakshnath
#अलखनिरंजन#hindusaint #ancienthistory #maharashtra #maharashtraculture #devotionalplaces #spritual #spritualpath #devotional #devotion #नवनाथ #नवनाथकथासार #नवनाथग्रंथ #rahuri #shirdi #maharshtra #nathsampraday #kanifnath #gorakshnath #gorakshanath #machindranath #machindranathstatus #sai #shirdisai #saptshrungi #vani #सप्तशृंगी #मार्कंडेय #markandeya #markandeyapuranam #machindranath machindranath#मच्छिंद्रनाथ #shirdisaibaba #blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers
#blogger #blog #blogs #blogging #bloggers #bloger #bloglife #vlog #vlogs #vlogger #vlogging #vlogvideo #vloggers #dhamori
#adbanginathmaharaj #dhamori #gorakshnath