Torna Fort Trek Accident:तोरणा किल्ल्यावर ट्रेकला गेलेल्या Ranjeet Shinde यांचा मृत्यू कशामुळं झाला?
BolBhidu
0:00 / 0:00
Torna Fort Trek Accident:तोरणा किल्ल्यावर ट्रेकला गेलेल्या Ranjeet Shinde यांचा मृत्यू कशामुळं झाला?
133 822 просмотра · 1 год назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
133 822 просмотра · 1 год назад
#BolBhidu #TornaFortTrek #RanjeetShinde
तोरणा किल्ला म्हणजे तसा आडवळणाचा. ट्रेकर्समध्ये या किल्ल्याची क्रेझ असली, तरी सर्वसामांन्यांसाठी हा किल्ला चढणं तसं अवघडंच. किल्ल्यावर चढताना योग्य काळजी घेतली नाही, तर हा ट्रेक जिवावर देखील बेतू शकतो, असंच इथे ट्रेकचा अनुभव घेतलेल्या ट्रेकर्सकडून सांगितलं जातं. असंच काहीसं पुण्यातील वारजे इथे राहणाऱ्या रणजित शिंदे यांच्यासोबत घडलंय. ४४ वर्षीय रणजीत मोहनदास शिंदे शनिवारी संध्याकाळी पुणे जिल्ल्ह्यातील तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. शिंदे यांना तोरणा गड चढताना हार्टअटॅक आल्याचं सांगितलं जातंय.
ट्रेकिंग दरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, दरम्यान त्यांना स्ट्रोक आला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात येतेय. आता रणजीत शिंदे यांना गड चढताना नेमका हार्ट अटॅक कसा आला? मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह गडावरून खाली कसा आणला गेला? ट्रेक करताना अशा घटना घडू नयेत यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी? ही सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/