(सर्वोत्तम-निसर्गगाणं आणि एसइओ अनुकूल):निल नभांगणी दाटून!|Nil Nabhangani...Marathi Nature Song 2026
Ganadhish_Creation
0:00 / 0:00
(सर्वोत्तम-निसर्गगाणं आणि एसइओ अनुकूल):निल नभांगणी दाटून!|Nil Nabhangani...Marathi Nature Song 2026
2 594 просмотра · 1 мес. назад
Ganadhish_Creation
154 подписчика
2 594 просмотра · 1 мес. назад
शीर्षक: निल नभांगणी दाटून आले काळे काळे मेघ (Nil Nabhangani Datun Aale Kale Kale Megh!)
श्रावण महिन्यात उंच नभांगणी काळे मेघ दाटून येऊन ऊन्हात पावसाच्या सरी जणू पा-यासारख्या भासू लागतात.त्या निसर्गाचे सौंदर्य वर्णन करणारे ही सुंदर सांगितिक रचना!
@ गीत व संगीत क्रेडिट्स(Credits):
© गीतकार (Lyricist): प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
गायक व संगीत(Singer & Music):Suno AI
(Licensed under Paid Subscription Plan)
© संकल्पना व निर्मिती:
प्रा.पुरुषोत्तम सुपीबेन म.पटेल "पुष्प"
गाण्याचे बोल:
नील नभांगणी दाटून आले,काळे काळे मेघ
नील नभांगणी दाटून आले, काळे काळे मेघ
जलद ओढित आला, जलधारांची श्वेत रेघ!
लखलख उंच नभी शुभ्र, चपला मस्तवाल
काळ्या भूईने पांघरली, जलाची पारद शाल
काळ्या भूईने पांघरली, जलाची पारद शाल
लखलख उंच नभी शुभ्र, चपला मस्तवाल
गोदुग्ध भासे पहा सरींवर, कोसळती सरी
धरा झाली सखी,राधा सवे…रास खेळे श्रीहरी
पहा गिरिशिखरीची सरिता, धावे वायूगती
आतुर झाली भेटाया, प्रिय आपुला श्रीपाल
काळ्या भूईने पांघरली,जलाची पारद शाल
लखलख उंच नभी शुभ्र, चपला मस्तवाल
काळ्या भूईने पांघरली, जलाची पारद शाल
भिजले रान भिजून गेले, सारे दरी डोंगर
वायुसंगे पर्णाची पिपाणी, वाजवीती तरुवर
भेट होता मेघसख्याची ,आनंदली वसुंधरा
मिलनात हरवली सुंदरा, लाजेने लाली लाल
काळ्या भूईने पांघरली, जलाची पारद शाल
लखलख उंच नभी शुभ्र, चपला मस्तवाल
काळ्या,भूईने पांघरली, जलाची पारद शाल
प्रतीची नटली नेसूनी, सप्तरंगी इंद्रधनु शालू
पक्षी किलबिलाट वाटे,जणू कृष्णाची वेणू
बलाकमाला पाहताती, गमे जणू कुमुदिनी
नारायणा संगे पहा निघाली, शांत संध्याकाळ
काळ्या भूईने पांघरली,जलाची पारद शाल
लखलख उंच नभी ,शुभ्र चपला मस्तवाल
काळ्या भूईने पांघरली, जलाची पारद शाल
काळ्या भूईने पांघरली, जलाची पारद शाल
जर तुम्हाला हे गीत आणि त्यातील भाव आवडले असेल तर,व्हिडीओला लाईक(Like) करा.आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर (Share)करा आणि अशाच नवनवीन भावस्पर्शी रचनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरु नका.
हॅशटॅग्ज:
#MarathiSong #Nature Song #Nil Nabhangani DatunAaleKaleKaleMegh #MarathiNatureSong2026