Перейти к содержимому

#सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहात*

@Shodhtimesnews

0:00 / 0:00

#सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहात*

21 просмотр · 13 дн. назад
@Shodhtimesnews
720 подписчиков
21 просмотр · 13 дн. назад
#news #ख़बर1इंडिया #shodhtimes #latestnews #breakingnews #पुणे सेवा संकल्प अभियानांतर्गत जागतिक रेबीज दिन उत्साहात पुणे, दि. २८ : सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, घोडेगाव, ता. आंबेगाव येथे जागतिक रेबीज दिन उत्साहात आणि जनजागृतीपर वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना रेबीज आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्राण्यांशी सुरक्षित वर्तन तसेच कुत्रा किंवा अन्य प्राण्याने चावा घेतल्यानंतर करावयाच्या तातडीच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पी. डी. साळवे, शाळेचे प्राचार्य श्री. गणेश गावडे , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा डफळ व डॉ. रुपेश खामकर, तसेच नोडल अधिकारी श्री. गजानन वनारसे उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना रेबीज या गंभीर आजाराविषयी सोप्या, शास्त्रीय आणि व्यवहार्य पद्धतीने माहिती दिली. प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, कुत्रा किंवा अन्य प्राण्याने चावा घेतल्यास जखम साबण आणि वाहत्या पाण्याने तात्काळ स्वच्छ धुणे तसेच विलंब न करता वैद्यकीय सल्ला घेणे या प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यामुळे रेबीज प्रतिबंध आणि प्राण्यांशी सुरक्षित वर्तन याबाबत विद्यार्थ्यांची समज अधिक दृढ झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कीर्ती टोपे यांनी केले. उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य-जागरूकता, प्राणीप्रेम, जबाबदार वर्तन आणि सामाजिक आरोग्याबाबतची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार, आरोग्य-जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.