Перейти к содержимому

Dhiraj Pardeshi Murder Case | धर्म-टिळा नाही, हत्येचं कारण वेगळंच; तपासात समोर आला थरार...

Ahilyanagarlive24

0:00 / 0:00

Dhiraj Pardeshi Murder Case | धर्म-टिळा नाही, हत्येचं कारण वेगळंच; तपासात समोर आला थरार...

104 134 просмотра · 13 дней назад
Ahilyanagarlive24
117 тыс. подписчиков
104 134 просмотра · 13 дней назад
७ ऑगस्टला नुसतं नगरच नाही, तर संपूर्ण राज्य हादरलं. अहिल्यानगर मनपाचा कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी याची हत्या झाली. हत्या झाली ते ठिकाण मुस्लिमबहुल होतं. हल्ला करणारे संशयितही मुस्लिम समाजाचेच होते. त्यामुळे नगरचं राजकीय व सामाजिक वातावरण, एकदम बदललं. हा हल्ला धार्मिक कारणांतून झाल्याच्या चर्चा झाल्या. कपाळाला भगवा टिळा लावल्यानं आपल्या पतीला मारल्याचं मृत्याच्या पत्नीनं सांगितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. ९ ऑगस्टला नगरला रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आंदोनकर्त्यांशी चर्चा करुन, कुटुंबाला धीर द्यावा लागला. या घटनेपासून जिल्ह्यात एक धार्मिक पिळ पडला, तो गेल्या १०-१५ दिवसांपासून कायम आहे. घटनेच्या तपासाचा दबाव पोलिसांवर होताच. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलली आणि १२ संशयीतांना अटक केली. या सर्वांना पोलिस कोठडी मिळाली होती. त्यात जे सत्य समोर आलं, ते तपासी अधिकारी एपीआय तेजश्री थोरात यांनी न्यायालयात सादर केलं. या रिमांड रिपोर्टमध्ये, ना धर्माचा उल्लेख आहे, ना कपाळावरील टिळ्याचा... मग ही हत्या नेमकी का झाली? घटनाक्रम कसा आणि काय होता? हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत... गेल्या दहा वर्षांपासून अहिल्यानगरकरांच्या सेवेत असलेले नगर जिल्ह्याचं नंबर १ न्यूजनेटवर्क ! ब्रेकिंग बातम्या | ग्राउंड रिपोर्ट | पॉडकास्ट | सविस्तर लेख | इन्फोटेनमेंट, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र बद्दल सर्व काही एक क्लिकवर बातम्या, लेख आणि तक्रारी साठी संपर्क : ahilyanagarlive24@gmail.com अहिल्यानगर आणि महत्वाच्या बातम्या पहा वेबसाईटवर https://ahilyanagarlive24.com #Ahilyanagar #AhilyanagarNews #Ahilyanagarlive #Ahilyanagarlive24 #Ahilyanagarvideos #