बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 शासकीय आश्रमशाळा सूर्यमाळ आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
SAMARPAN FOUNDATION AMBADI NAKA
0:00 / 0:00
बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 शासकीय आश्रमशाळा सूर्यमाळ आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
19 819 просмотров · 1 г. назад
SAMARPAN FOUNDATION AMBADI NAKA
457 подписчиков
19 819 просмотров · 1 г. назад
🚨🏥👩🔬🚑
समर्पण फाउंडेशन व नवजीवन हॉस्पिटल ,अंबाडी नाका आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, खोडाळा यांच्या सहकार्याने
शासकीय आश्रमशाळा ,सूर्यमाळ येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सूर्यमाळ ,ता. मोखाडा , जि. पालघर येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा येथे सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित केले होते.
खरूज ,त्वचेचे आजार, ताप, सर्दी,खोकला, जखमा, दातांचे आजार यावर तपासणी करून उपचार व चांगल्या प्रतीची औषधे मोफत देण्यात आली.
सर्व वसतिगृहातील मुलांना आरोग्य व स्वछता याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
सर्व किशोरवयीन मुलींना मासिक पाळी व स्वच्छता याबद्दल मार्गदर्शन करून आवश्यक उपचार देण्यात आले.
सर्व मुलांना जंतविरोधक गोळ्या , खरजेसाठी साबण व मलम , कॅल्शिअम , मलटिव्हिटॅमिन व आयर्न चे चांगले टॉनिक्स देण्यात आले.
उपस्थित विद्यार्थी व सर्व शिक्षक वर्ग यांनी प्रत्येक मुलाची वैयक्तिक तपासणी व विचारपूस करून चांगली औषधे मिळाली यासाठी खूप समाधान झाले असे सांगून समर्पण फाउंडेशन चे आभार मानले.
या शिबिरासाठी समर्पण फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. विनय पाटील , सचिव श्री. सतिश पाटील व डॉ. वर्षा पाटील ,डॉ. मोहित पाटील व डॉ. निनाली जाधव उपस्थित होते. नवजीवन हॉस्पिटल , अंबाडी नाका येथील स्टाफ सौ. प्रतिभा ,सौ. सपना ,श्री. संजय जाधव, श्री. प्रशांत घोडविंदे, सौ. सानिका पाटील यांनी सर्वानी सहकार्य केले.
तसेच PHC खोडाळा आणि प्राथमिक आरोग्य पथक सूर्यमाळ येथील डॉ. बडगुजर सर, फार्मासिस्ट श्री. विनोद संचेती, श्री. गवारी आरोग्य सहाय्यक, नर्सिंग स्टाफ आणि आश्रमशाळेचे मान. मुख्याध्यापक , मान. अधिक्षक , सर्व शिक्षकवृंद व स्टाफ यांनी या शिबिरासाठी विशेष सहकार्य केले.