Перейти к содержимому

आषाढी एकादशी सोहळा,नाधवडे गांव 2023 || वैभववाडी ||

KokanHeartedGirl

0:00 / 0:00

आषाढी एकादशी सोहळा,नाधवडे गांव 2023 || वैभववाडी ||

41 041 просмотр · 3 г. назад
KokanHeartedGirl
599 тыс. подписчиков
41 041 просмотр · 3 г. назад
नाधवडे क्षेत्रे, गोठणा नदी पश्चिम तीरे, श्रीविठ्ठल रखुमाई निवासे वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गांव म्हणजे विश्वविधात्याने मुक्त हस्ताने रेखाटलेले एक अनोखे चित्रच असेच म्हणावे लागेल. गावाला लाभलेले अभिजात निसर्ग सौंदर्य आणि त्याला जोड म्हणून लाभलेली देवाच्या नानाविध रूपातील मंदिरे जणू देवभूमीची अनुभूती देत राहतात. ज्यामुळे वर्षभरात त्या देवतांचे होणारे वेगवेगळे उत्सव आणि गावरहाटीतील सण समारंभ यातील सर्व गावकऱ्यांचा सलोख्याने होणारा सहभाग गावातील ऐक्याची साक्ष देतात. गावात एकंदर वेगवेगळ्या देवतांची 13 मंदिरे 2 मस्जिद आणि 1 बुद्ध विहार असून सर्व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने आणि एकमेकांच्या उत्सवात तन मन धनाने सहभागी होऊन गावाचा एकोपा जपण्याचा प्रयत्न करतात. याच गावातील एक असणारे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात यावर्षी आषाढी एकादशी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून या तीर्थक्षेत्राची महती सर्वदूर पसरविण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केलाय. त्यानिमित्त गुरुवार दिनांक 29 जून 2023 रोजी येणाऱ्या आषाढी वारीच्या योगावर दिवसभरात पारंपारिक षोडशोपचार पूजाविधीसह भव्य वारकरी दिंडी, दर्शन, फलाहार वाटप, कीर्तन, भजने आणि शेजारती अशा नानाविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यात पंचक्रोशीसह तालुक्यातून सर्व भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन गावकऱ्यांच्यावतीने करण्यात आले असून आजवर केवळ गावकऱ्यांपुरतेच् मर्यादीत असणारे हे तीर्थक्षेत्र आत्ता पंचक्रोशीत अन् कालपरत्वे तालुका आणि जिल्ह्याच्या सीमेपलीकडे नेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जात आहे. नाधवडे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि त्याचा स्थानमहिमा याची माहिती अजूनही कित्येकांना नाही. कारण दरवर्षी गावकऱ्यांमार्फत होणारी आषाढी वारीची दिंडी आणि कार्तिक महिन्यातील सात प्रहरांचा अखंड हरिनाम सप्ताह यापलिकडे कोणतेही मोठे धार्मिक कार्यक्रम इथे साजरे होत नसल्याने केवळ गावमर्यादीच या स्थानाचे महत्व अधोरेखित असल्याने आजूबाजूच्या भाविक भक्तांना हे स्थान अपरिचित होते. तसा या मंदिराचा परिसर निसर्गाच्या सान्निध्यात असूनही कित्येकांच्यादृष्टीने दुर्लक्षितच आहे. कारण भरवस्तीत असूनही मुख्य महामार्गापासून आडबाजूला हे स्थान आहे. तसेच या मंदिराकडे जाणारा मार्ग हा नागरी वस्तीतून जात असल्याने अरुंदही आहे. हे एक त्यागील कारण असू शकते. या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरासमोरच एक पाण्याची तळी आहे. या तळीत पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक मनमोहक दृश्य आपले लक्ष वेधून घेते; ते म्हणजे तळीच्या दोन्ही टोकांना दोन जीवंत झरे अविरतपणे वाहत असल्याचे आपल्या नजरेत येतात. त्याबाबत गावकऱ्यात एक श्रद्धायुक्त भावना आहे की, हे दोन्ही झरे म्हणजे श्री विठ्ठल आणि श्री रखुमाई यांच्या चरणांना स्पर्श करून आलेले आहेत. या तळीला लागूनच गावची जीवनदायिनी गोठणा नदी आजुबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम करीत बारमाही वाहत आहे. ज्यामुळे मंदिर परिसरात संपूर्ण वर्षभर हिरवळ आणि सावली असल्यामुळे कायम शांत, निरामय आणि प्रसन्न वातावरण असते. त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांचा शीण क्षणात दूर होण्यास मदत होते. असे या स्थानाचे महत्व आहे. या वर्षीच्या आषाढी वारीनिमित्त या तीर्थक्षेत्राला भेट देवून "याची देही याची डोळा" ही अनुभूती घेण्याचा अलभ्य लाभ यानिमित्त आलेला आहे. तेव्हा यंदा म्हणा...... "चला नाधवडेशी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू". पुरुषोत्तम उर्फ बाबा ——————————————————————- Devachiye Dwari Spotify : https://spoti.fi/3O0N24i Apple Music : https://apple.co/44mVlwK Amazon Music : https://amzn.to/46xri7p YouTube Music : https://bit.ly/46Cepck ——————————————————————————— Post production of video by Tikvah Ark Productions DOP - Saurabh Shingare