कुडाळ कणकवली मार्गे सावडाव धबधबा || Savdav waterfall || PSKudalkar || konkan
सह्याद्रीच्या हृदयात
0:00 / 0:00
कुडाळ कणकवली मार्गे सावडाव धबधबा || Savdav waterfall || PSKudalkar || konkan
270 просмотров · 1 мес. назад
सह्याद्रीच्या हृदयात
438 подписчиков
270 просмотров · 1 мес. назад
कुडाळ कणकवली मार्गे सावडाव धबधबा || Savdav waterfall || PSKudalkar || konkan
नमस्कार मंडळी 🙏
मी प्रकाश कुडाळकर, ‘सह्याद्रीच्या हृदयात’ या आपल्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो.
आज आपण पाहणार आहोत कोकणातील निसर्गरम्य सावडाव धबधबा. 🌿💦
कुडाळवरून आम्ही कणकवलीच्या दिशेने संध्याकाळी प्रवासाला सुरुवात केली. आकाशात ढगांची दाटी होती आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. रस्त्यावरून जाणारी वाहने रस्त्यावरील पाणी उडवत आपापल्या दिशेने मार्गक्रमण करत होती.
पावसामुळे चहूबाजूंनी निसर्ग खुलून दिसत होता. हिरवागार डोंगर, झाडाझुडपांनी नटलेला परिसर आणि
पावसाच्या सरींनी वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं.
आणि अखेर आपण पोहोचलो सावडाव धबधब्याजवळ!
धबधब्यावरून खळखळत खाली कोसळणारं पाणी, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि हा मनमोहक परिसर पाहताना डोळ्यांचं पारणं फिटत होतं. धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेली मंडळीही या निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद घेत होती.
काही वेळ या सुंदर निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
परतीच्या वाटेवर हुंबरठ येथे थांबून गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेतला. ☕🥘 पावसाळी वातावरणात गरमागरम भजी आणि चहा म्हणजे प्रवासातील एक वेगळीच मजा!
चहा-भजीचा आस्वाद घेतल्यानंतर पुन्हा कुडाळच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.
तर मंडळी, असा झाला आमचा कुडाळ ते सावडाव धबधबा आणि परतीचा सुंदर पावसाळी प्रवास.
निसर्ग, पाऊस, धबधबा आणि गरमागरम भजी-चहा… या सगळ्यामुळे हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय झाला! 🙏🌿
‘सह्याद्रीच्या हृदयात’ अशाच सुंदर प्रवासासाठी माझ्यासोबत राहा. ❤️
#Savdav_waterfall
#PSKudalkar
#femus_savdav
#सावडाव_धबधबा
#सावडाव