डहाणू || कासा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयाला विरोध; धुंदलवाडी डहाणू तालुक्यातच ठेवण्याची मागणी
Palghar News Network
0:00 / 0:00
डहाणू || कासा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयाला विरोध; धुंदलवाडी डहाणू तालुक्यातच ठेवण्याची मागणी
21 985 просмотров · 9 дн. назад
Palghar News Network
138 тыс. подписчиков
21 985 просмотров · 9 дн. назад
डहाणू प्रतिनिधी
कासा येथे प्रस्तावित नवीन अपर तहसीलदार कार्यालयाच्या निर्मितीच्या पार्श्वभूमीवर धुंदलवाडी गावाचा समावेश डहाणू तालुक्यातून अन्य तालुक्यात करण्यात येऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व माजी शासकीय आदिवासी सेवक पुरस्कार सन्मानित वसंत एन. भसरा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हरकती 100 पेक्षा जास्त अर्ज व स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर केला आहे.
निवेदनानुसार, कासा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी काही गावांचा समावेश करण्यात येणार आहे. मात्र, धुंदलवाडी हे गाव डहाणू तालुक्याच्या मुख्य रस्त्याला जोडलेले असून कासा हे गावासाठी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे ठिकाण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कासाकडे जाण्यासाठी वाहनांची विविध साधने सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी ये-जा करणे सुलभ होते, असा दावा करण्यात आला आहे.
धुंदलवाडी गावाचा कासा मध्ये समावेश झाल्यास नागरिकांना विविध त्रास व गैरसोयींना सामोरे जावे लागू शकते. यापूर्वीही विविध प्रश्न व नुकसान सहन केल्याने आता प्रशासकीय बदलाच्या नावाखाली आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास तसेच हेलपाटे वाढविणे मान्य नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे डहाणू तालुक्याच्या भविष्यातील विकासाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. डहाणू तालुक्याला समुद्रकिनारा, बंदर, रेल्वे, विमानतळ आदी विविध साधनसंपत्ती उपलब्ध असून भविष्यात मोठ्या विकासकामांची शक्यता आहे. त्यामुळे या विकासाच्या प्रवाहापासून धुंदलवाडी गाव वंचित राहू नये, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
“धुंदलवाडी नागरिकांच्या सोयीसाठी आमचा समावेश डहाणू तालुक्यातच कायम ठेवावा. डहाणू तालुक्यातील १०० टक्के सोयी-सुविधांचा लाभ नागरिकांना मिळत असताना आम्हाला अन्य तालुक्यात समाविष्ट करण्यात येऊ नये,” अशी मागणी वसंत भसरा यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आली असून, धुंदलवाडी गावाचा प्रस्तावित प्रशासकीय बदलात समावेश करण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.