Jagannath Puri Rath Yatra: मराठ्यांची लढाई ते अंधारातली पूजा, Jagannath Temple बद्दलच्या गूढ गोष्टी
BolBhidu
0:00 / 0:00
Jagannath Puri Rath Yatra: मराठ्यांची लढाई ते अंधारातली पूजा, Jagannath Temple बद्दलच्या गूढ गोष्टी
188 139 просмотров · 1 год назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
188 139 просмотров · 1 год назад
#BolBhidu #JagannathPuriRathYatra #JagannathPuri
सध्या इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना तुम्हाला जगन्नाथ पुरीमधल्या रथयात्रेचे रील्स हमखास दिसत असतील, या रथयात्रेचे, इथल्या गर्दीचे, इथल्या भव्यतेचे फक्त रील्सच नाहीत तर बातम्या सुद्धा होतायत. भारतातून, जगभरातुन इथे मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. याचं कारण अर्थातच इथली परंपरा, इथला इतिहास आणि भाविकांची श्रद्धा. पण जगन्नाथ पुरी फक्त रथयात्रेमुळे चर्चेत येत नाही, या मंदिराची, इथल्या परिसराची चर्चा होण्याच आणखी एक कारण आहे, या मंदिराबद्दल असलेली रहस्य. या मंदिराबद्दल सांगितल्या जाणाऱ्या आख्यायिका. एका पौराणिक कथेनुसार, एकदा जगन्नाथ पुरीमध्ये रथ यात्रा सुरु असताना एक अस्ताव्यस्त अवस्थेतला व्यक्ती थेट रथावर चढला. ते बघताच पुजाऱ्यांनी त्याला रथावरून खाली उतरवलं, हाकलून लावलं. बलराम दास असं त्याचं नाव. बलराम दासने समुद्रकिनारी जाऊन वाळूचे तीन रथ बनवले.
पण त्यानंतर रथ यात्रेतील रथ पुढे जाईनासे झाले. हत्ती, घोड्यांची ताकद लावूनही रथ हालले नाहीत. या कथेनुसार भक्त बलराम दासच्या इच्छेसाठी भगवान विष्णू, भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रासह या वाळूच्या रथात विराजमान झाले. ज्यामुळे भगवान विष्णू यांना स्वतःचीच रथयात्रा थांबवावी लागली. या कथेचा पुरावा नसला तरी, जगन्नाथ पुरीचं मंदिर आणि रथयात्रेचा मात्र पुरावा इतिहासात आढळतो. १७ वेळा शत्रूची आक्रमणं होऊनही कोणाला जगन्नाथ पुरीचं मंदिर उध्वस्त करता आलं नाही, औरंगजेबानेही मंदिर फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र मराठ्यांची औरंगजेबाशी लढाई अप्रत्यक्षपणे जगन्नाथ पुरीचं मंदिर वाचवणारी ठरली. जगन्नाथ पुरी मंदिर आणि रथ यात्रेबद्दलच्या १० रहस्यमय आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/