Перейти к содержимому

८० वा स्वातंत्र्य महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण,जल्लोषपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला

P G SCHOLAR INTERNATIONAL ENGLISH SCHOOL

0:00 / 0:00

८० वा स्वातंत्र्य महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण,जल्लोषपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला

56 просмотров · 12 дней назад
P G SCHOLAR INTERNATIONAL ENGLISH SCHOOL
13 подписчиков
56 просмотров · 12 дней назад
🌼🇮🇳 ८० वा स्वातंत्र्य महोत्सव – स्वातंत्र्यदिन 🇮🇳🌼 ✨ “तिरंग्याच्या साक्षीने अभिमान जागला, देशभक्तीच्या भावनेने प्रत्येक चेहरा खुलला; स्वातंत्र्याच्या अमृतक्षणी एकच नाद घुमला, भारत माता की जय… जय हिंदचा जयघोष झाला!” 🇮🇳❤️ संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन व पालक हरिप्रिया एज्युकेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणाऱ्या पी. जी. स्कॉलर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल आणि राजर्षी शाहू महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिद्धेश्वर नगर, अंबर हिल, जटवाडा रोड, ओहर, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य महोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण, जल्लोषपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. 🇮🇳✨ 🌹 प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेली मान्यवरांची उपस्थिती 🌹 🌹 मा. श्री. भरत भागोजी महाडिक 🌹 मा. श्री. प्रसाद भरत महाडिक (प्राचार्य, उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय) 🌹 मा. श्री. गोपाळ जगन्नाथ जाधव (प्राचार्य, उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय) *यांची प्रेरणादायी उपस्थिती विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक, मार्गदर्शक आणि निश्चितच अविस्मरणीय ठरली.*🌷 तसेच संस्थेचे पदाधिकारी 🌹 मा. श्री. जगदीशजी देसले सर 🌹 मा. श्री. हिरालालजी गतखणे सर 🌹 मा. सौ. दुर्गा हिरालाल गतखणे मॅडम 🌹 मा. श्री. ऋषिकेशजी गतखणे सर 🌹 मा. कु. पलक हिरालाल गतखणे मॅडम यांच्या शुभ उपस्थितीत ध्वजारोहण व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. 🪔🇮🇳 या प्रसंगी पी.जी.स्कॉलर इंटरनॅशनल पब्लिक स्कूल व राजर्षी शाहू महाराज प्राथ. माध्य. व उच्च माध्य. विद्यालय चे मु. अ. श्री. पठाण सर व मु. अ. श्री. पदमने सर , राजर्षी शाहू महाराज प्राथ. विद्यालय चे मु. अ. श्री. राठोड सर आणि जी.स्कॉलर इंटरनॅशनल पब्लिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री महाडिक सर इत्यादीची उपस्थिती लाभली. 🎭 विद्यार्थ्यांच्या विविध देशभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. 🎤 प्रभावी देशभक्तीपर भाषणे 🎶 मनाला भिडणारी समूहगीते 💃 देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्याविष्कार 🥁 जोशपूर्ण लेझीम पथकाचे सादरीकरण या सर्व सादरीकरणांनी उपस्थितांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि एकतेची भावना जागवली आणि संपूर्ण वातावरण “देश प्रथम” या भावनेने भारावून गेले. 🇮🇳❤️ ✨ “स्वातंत्र्य हे केवळ पर्व नाही, ही शूरवीरांच्या बलिदानाची कहाणी आहे; तिरंगा सदैव उंच राहावा, हीच प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे!” 🇮🇳 🌺 देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक वीराला विनम्र अभिवादन! 🌺