Satej Patil VS Mahadik | पाटील-महाडिक संघर्षाला नवी धार, पाटलांना शौमिका महाडिकांचं आव्हान
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Satej Patil VS Mahadik | पाटील-महाडिक संघर्षाला नवी धार, पाटलांना शौमिका महाडिकांचं आव्हान
228 990 просмотров · 2 г. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
228 990 просмотров · 2 г. назад
#SatejPatil #ShoumikaMahadik #ShoumikaMahadik #MahadevraoMahadik #HasanMushrif #GokulDudhSangh #KolhapurPolitics
सतेज बंटी पाटील... असा नेता ज्याच्या जिव्हारी एक पराभव लागला अन् कोल्हापूरच्या राजकारणात वर्चस्वाची लढाई टोकाला गेली.. सतेज पाटलांनी अगोदर महादेवराव महाडिकांना पराभव दाखवला. मग अमल महाडिकांची आमदारकी हिसकावली. अन् त्यानंतर स्थानिक राजकारणातील एकेक संस्था ताब्यात घेतल्या. वर्चस्वाची लढाई काय असते अन् विरोधकांचा बदला कसा घ्यायचा असतो याचा पॅटर्न सतेज पाटलांनी सेट केलाय. आता जिल्हा बॅँकेपासून गोकुळ दुध संघापर्यंत सगळीकडे सतेज पाटलांचाच बोलबाला आहे.. गोकुळवर ताबा मिळवून सतेज पाटलांनी महाडिकांचा कंडकाही पाडला. पण सतेज पाटलांनी एकहाती सत्ता मिळवूनही महाडिकांनी गोकुळवरची आपली पकड कमी होऊ दिली नाही. महाडिकांचा एकच संचालक सतेज पाटलांच्या सत्तेला कसं आव्हान देतायत, तेच या व्हीडीओत पाहू.