Jakadi | Kokan Rangbhumi | Kokanaatil Jakadi | Kokan Ek Rangbhumi | Part १
Kokan - Ek Rangbhumi
0:00 / 0:00
Jakadi | Kokan Rangbhumi | Kokanaatil Jakadi | Kokan Ek Rangbhumi | Part १
4 142 просмотра · 3 года назад
Kokan - Ek Rangbhumi
4,8 тыс. подписчиков
4 142 просмотра · 3 года назад
गणेशोत्सवादरम्यान कोकणात जपली जाणारी एक सोज्वळ लोककला जाकडी.
महीला पुरुष एकत्र येउन ही कला सादर करतात, ही कला पुर्वापार चालत असल्या कारणास्तव या कलेचा काही फारसा पोशाख ठरलेला नाही, पुर्वी वाडवडिलांकडे रंगीबेरंगी वस्त्रांची उपलब्धता नसायची मिळेल ते वस्त्र परिधान करुन ते कला सादर करीत असत. महिला सहसा साडी , कट ब्लाउज परकर अन पुरुष मिळेल ते वस्त्र जस टॉवेल , हाफ पॅंट , शर्ट इं . पोशाख वापरायचे. सध्या आपण पाहिलच असेल सध्या कलेतील लोककला हरवत चालली असुन त्याची जागा अश्लील अवकलेने घेतली आहे त्यात खुप काही प्रमाणात बदल घडवुन आणलेत. असो ....
सदर जाकडी लोककला हि फक्त निखळ मनोरंजन आणि प्रबोधनपर सोज्वळ आहे यात कोणताही अश्लीलपणा नाही आणि एखाद्याचा स्पर्धेसाठी कमीलेखपणा नाही.
लोककला ही श्रेष्ठ आणि सोज्वळच आहे पण काही विपरीत बुध्दीच्या जोरावर या कलेला काळीमा फासला जात आहे यावर दक्षतेने लक्ष ठेवायलाच हव.
लोककला ही प्रसिद्धीच्या अशा शिखरावर आहे ज्यास कोणत्याही राजाश्रयाची आवश्यकता नाही कारण कोकणातील लोककलेला राजाश्रय मिळावा यावर भर न देता ही कला सोज्वळपणे कशी जपता येइल यावर भर दिला पाहिजें
उदा. तळकोकणातील दशावर हीच खरी कोकणची लोककला कारण वर्षे उलटुन गेली पण त्या कलेत नावीन्य आणि अश्लीलता यास जागा दिली नाही अन तिथल्या लोकांनी ही कला तंतोतंत जशीच्या तशी जपलीय...... खरच म्हणतात ना कोकणातील लोककला जपावी ती फक्त तळकोकणातील मालवण सिंधुदुर्ग च्या लोकांनीच......