Ring road kalyan work updates | जाणून घेऊया झालेल्या कामाची माहिती
Droneman kalpesh jadhav
0:00 / 0:00
Ring road kalyan work updates | जाणून घेऊया झालेल्या कामाची माहिती
8 918 просмотров · 10 дн. назад
Droneman kalpesh jadhav
17 тыс. подписчиков
8 918 просмотров · 10 дн. назад
#Dronemankalpeshjadhav
#Droneman_kalpesh_jadhav
नमस्कार मित्रांनो.....
🙏🙏🙏🙏🙏🙏
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण पाहणार आहोत ड्रोनच्या नजरेतून ...................
Ring road kalyan work updates | जाणून घेऊया झालेल्या कामाची माहिती
-----------------------------------------------------------------
IMFORMATION-
कल्याण रिंग रोड (Kalyan Ring Road) हा कल्याण आणि डोंबिवली परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (MMRDA) आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) यांच्यामार्फत राबवला जाणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे.
प्रकल्पाची प्रमुख माहिती:
• उद्देश: कल्याण ते ठाणे आणि डोंबिवली ते टिटवाळा यांमधील अंतर आणि प्रवास वेळ कमी करणे. काटई ते टिटवाळा प्रवास वेळ १५-२० मिनिटांवर आणणे.
• एकूण टप्पे: हा प्रकल्प ८ टप्प्यांमध्ये उभारला जात आहे.
• पूर्ण झालेले टप्पे (अंदाजे ९५% काम पूर्ण): टप्पा ४ (दुर्गाडी पूल ते गांधारी पूल), टप्पा ५ (गांधारी पूल ते मांडा जंक्शन), टप्पा ६ (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), आणि टप्पा ७ (टिटवाळा जंक्शन ते SH 35-40 रोड जंक्शन) हे रस्ते नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत
• इतर टप्पे:
• टप्पा ३ (मोठागाव पूल / दुर्गाडी ते मोटागाव-मनकोली): या टप्प्याचे व पुलाच्या खांबांचे काम वेगाने सुरू आहे.
• टप्पा २ (शीळ रोड ते मोठागाव पूल): भूसंपादनातील अडथळ्यांमुळे याच्या आराखड्यात बदल करून खाडीकिनाऱ्यालगत ओपन स्पेसच्या स्वरूपात आखणी करण्यात आली आहे.
• टप्पा १: भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
मुख्य फायदे:
• शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांचा भार कमी होईल.
• अवजड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून होईल.
• कल्याण हे भविष्यात एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होण्यास मदत होईल
डोंबिवली आणि टिटवाळा या दोन्ही शहरांतील अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कल्याण रिंग रोड प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या एकूण आठ टप्प्यांपैकी टप्पा चार ते सात (दुर्गाडी ब्रिज ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) अशा चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर उर्वरित टप्प्यांचे काम देखील जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने वेगाने हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी आणि ग्रामीण भागाच्या वाहतुकीला अधिक गती प्राप्त करून देणारा कल्याण रिंग रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या मार्गाच्या उभारणीनंतर कल्याण, डोंबिवली सह आसपासच्या शहरातील वाहतूक जलदगतीने करणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितिचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, कल्याण डोंबिवली महानरपालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. यातील टप्पा क्र.४ मध्ये (दुर्गाडी ब्रिज ते गांधारे ब्रिज), टप्पा क्र.५ (गांधारी ब्रिज ते मांडा जंक्शन), टप्पा क्र.६मध्ये (मांडा जंक्शन ते टिटवाळा जंक्शन), टप्पा क्र.७ मध्ये (टिटवाळा जंक्शन ते एसएच ३५-४० रोड जंक्शन) या टप्प्यांचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तर रस्ता नागरिकांच्या सेवेत आला आहे. टप्पा क्र.३ (मोठा गाव ब्रिज ते गोविंदवाडी रोड) या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून २०२६ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. टप्पा क्र.१ (हेदुटणे ते शिळ रोड) आणि टप्पा क्र.२ (शीळ रोड ते मोठागाव ब्रीज) या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करून हे देखील काम २०२६ पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. कल्याण रिंग रोडमुळे काटई-टिटवाळा हे एक तासाचे अंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांवर येणार आहे. अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून होणार असून शहरातील वाहतूक व्यवस्थेवर भार येणार नाही. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीला गती मिळेल. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर शहरी आणि ग्रामीण भागातील वाहतूक सेवा अधिक सोयीची आणि गतिमान होणार आहे.
-----------------------------------------------------------------------
SPECIAL THANKS TO-
1] YouTube Audio Liabrary
२] filmora16 music
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#travellerkalpeshjadhav
#kalpesh_jadhav
___________________________________________________________________________
Ignor Hashtags:
#newchannel
#droneshots
#dronevideo
#kalpeshjadhav
________________________________________________________________________
TOPIC COVER :-