चिया पिकाची शेती तलमोड ता. उमरगा येथील महेंद्र साळुंके सर यांच्याशी सविस्तर माहिती...
Laxman Pawar
0:00 / 0:00
चिया पिकाची शेती तलमोड ता. उमरगा येथील महेंद्र साळुंके सर यांच्याशी सविस्तर माहिती...
37 859 просмотров · 3 года назад
Laxman Pawar
1,06 тыс. подписчиков
37 859 просмотров · 3 года назад
तलमोड येथे चियाची शेती......
उमरगा : लक्ष्मण पवार
उमरगा तालुक्यातील तलमोड येथील प्रगतशील शेतकरी महेंद्र साळुंके यांनी तब्बल तीन एकर क्षेत्रावर औषधी युक्त चिया ची शेती करीत पारंपरिक शेती व्यवसायाला फाटा देत नवनवीन प्रयोगाला पसंती दिली आहे.
त्यांनी रब्बी हंगामात पेरले जाणारे प्रमुख पिकाला फाटा देत अमेरिकेत पेरले जाणारे चिया ची ( महाराष्ट्रात ओळखले जाणारे चिया पिकाची ) पेरणी केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील तलमोड येथे महेंद्र साळुंके सरांनी तीन एकर क्षेत्रात पेरले आहे.
तलमोड येथे चियाचे पिक पाहण्यासाठी दररोज सीमावर्ती विविध गावातील शेतकरी येत आहेत. या पिकाची लागवड कसे करावे याची माहिती महेंद्र साळुंके सर यांच्या कडून घेत आहेत. सध्या या पिकाला सोयाबीन, हरबरा, गव्हू, ज्वारी या पिकांपेक्षा जास्त बाजार भाव मिळत आहे. भारतात या पिकाला चिया म्हणून ओळखले जाते! अमेरिकेत याला सुपर फुड या नावाने ओळखले जाते. या पिकाला सध्या बाजारात पंधरा हजार ते पंचेचाळीस हजार रुपये क्विंटल ला भाव मिळत आहे.
हे पिक शुगर, बी. पी, विटामिन, विविध औषधे तयार करण्यासाठी महत्वाचे ठरते. त्यामुळे त्यांनी केलेल्या नवीन प्रयोगाला सध्यातरी यश मिळाल्याचे दिसत आहे. कापणी चा महत्त्वाचा एक टप्पा येत्या दोन आठवड्यात येणार असल्याची माहिती सांगितले आहे. या कामी वडील आई व पत्नी चे सहकार्य होत असल्याचे सांगितले आहे.
संपर्क लक्ष्मण पवार
9921272625.