स्वामी माझे गुरु l Swami Majhe Guru | Life Guidance Through Swami l Devotional Story Song 2026
Mahalaxmi Music महालक्ष्मी म्युझिक
0:00 / 0:00
स्वामी माझे गुरु l Swami Majhe Guru | Life Guidance Through Swami l Devotional Story Song 2026
110 563 просмотра · 9 мес. назад
Mahalaxmi Music महालक्ष्मी म्युझिक
18,6 тыс. подписчиков
110 563 просмотра · 9 мес. назад
स्वामी माझे गुरु l Swami Majhe Guru | Life Guidance Through Swami l Devotional Story Song 2026
Title - Swami Majhe Guru
Singer - Ankita Brahma
Composer - Sohini Mishra
Lyrics - Shital Shinde Pacharane
Edit & VFX - Chetan Garud Productions Studios LLP
Label - Chetan Garud Productions Studios LLP
ही AI devotional story song आहे जिथे एका तरुणीला जीवनातील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते – तिच्या नोकरीतील समस्या, वैयक्तिक संकटे. पण स्वामी समर्थ ने प्रत्येक क्षणी मदत केली, विविध अवतारांमध्ये – ब्रह्मा, विष्णू, महेश्वर आणि श्री दत्तगुरु यांच्या रूपात.
गीताचे मुख्य संदेश:
संकटात सदैव पाठी – स्वामी माझे गुरु
गुरुविना जीवनाचा मार्ग कसा मिळतो?
भक्तिभावाने नामस्मरणाने भीती आणि चिंता दूर होतात
स्वामींच्या कृपेने जीवनात आनंद आणि मार्गदर्शन
गीत : स्वामी माझे गुरु
ब्रम्हा , विष्णू , महेश्वर
पुढ्यात माझ्या बसले
स्वामींच्या अवतारात मजला
श्री दत्तगुरु दिसले
गुरुदत्तांच्या सामोरी
वासरा घेउनी गाय
अन भक्तांसाठी स्वामी म्हणजे
खरोखरीची माय
वेळ कोणतीही असो
भक्तिभावाने तुम्हा स्मरू
संकटात सदैव पाठी
स्वामी माझे गुरु ....
संकटात सदैव पाठी
स्वामी माझे गुरु ...
गुरुविना फरफट जीवाची
दिशा कुठे मिळते
साथ असता स्वामींची
जगण्यास उभारी मिळते
दुःखाला ओहोटी आणि
आनंदा भरती येते
गुरुस्पर्शाने पावन इथले
मानवी जीवन होते
दयास्वरूप अथांग सागर
ममता दाटे उरी
सकलजनांचे दाता स्वामी
चूक-भूल घ्यावी पदरी
सोबत तुम्ही असताना
कुणाचे पाय धरू
संकटात सदैव पाठी
स्वामी माझे गुरु ....
संकटात सदैव पाठी
स्वामी माझे गुरु ...
स्वामींचा मार्ग अनोखा
नामजपाने जादू होते
हळूहळू भीतीचे सावट
नाहीसे होते
चुकली नाही वाट कधी
पाऊल चुकले जरी
वेळोवेळी मार्ग दाखवी
गुरुरूपात स्वामी घरी
शिष्य झालो तुमचा
आता चिंता कशाला करू
संकटात सदैव पाठी
स्वामी माझे गुरु ...
संकटात सदैव पाठी
स्वामी माझे गुरु ....
#SwamiSamarth
#SwamiMajheGuru
#DevotionalSong
#BhaktiGaani
#AIStorySong
#MarathiBhajan
#SpiritualSong2026