Devendra Fadanvis | RTI Act | देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक लाखाचा पुरस्कार मिळाला याची लाज वाटते
Lay Bhari News
0:00 / 0:00
Devendra Fadanvis | RTI Act | देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक लाखाचा पुरस्कार मिळाला याची लाज वाटते
299 просмотров · 7 часов назад
Lay Bhari News
128 тыс. подписчиков
299 просмотров · 7 часов назад
'सकाळ' वृत्तपत्रात नोकरी करत असताना पत्रकार तुषार खरात हे ' सकाळ इन्वेस्टीगेशन टीम'चे (SIT) नेतृत्व करीत होते. त्यांचे तत्कालीन सहकारी गोविंद तुपे यांना त्यावेळी 'मुंबई प्रेस क्लब'चा उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल एक लाख रुपयांचा 'रेड इंक' पुरस्कार मिळाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला होता. परंतु त्याची आम्हास लाज वाटते. कारण ज्या कारणासाठी हा पुरस्कार मिळाला, तो उद्देशच मातीत घालण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. गोविंद तुपे यांनी मोठ्या चिकाटीने पाठपुरावा करून महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे मोठे काम केले होते. त्यांच्या या पत्रकारितेमुळे सर्व मंत्री कार्यालयांना माहिती अधिकार कायदा लागू झाला होता. मंत्री कार्यालयांना माहिती अधिकार कायदा लागू करण्याचे आदेश तत्कालीन राज्य मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले होते. याबाबतची फाईल तत्कालीन राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठवली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जनहिताचा निर्णय कचऱ्याच्या डब्यात टाकून दिला. त्यांना या निर्णयाची अंमलबजावणी करायची नव्हती, तर त्यांनी आपल्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार सुद्धा प्रदान करायला नको होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला फसवलं, एका नामांकित पत्रकार संघटनेला फसवलं, आम्हालाही फसवलं. पत्रकारितेची थट्टा केली. म्हणून त्यांच्या हस्ते एक लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला याची लाज वाटते.
#तुषारखरात #देवेंद्रफडणवीस #गोविंदतुपे #सकाळ #Sakal #Investigation #RedInkAwards #MumbaiPressClub #माहितीचाअधिकार #RTI #पत्रकारिता #InvestigativeJournalism #महाराष्ट्र #मुख्यमंत्री #पत्रकार #जनहित #लयभारी