मागेन तुला by dr. Rajashri Sanjay jadhav
Rangchata
0:00 / 0:00
मागेन तुला by dr. Rajashri Sanjay jadhav
447 просмотров · 7 дней назад
Rangchata
112 подписчиков
447 просмотров · 7 дней назад
मागेन तुला
हे ईश्वरा जीवन जगताना
वैचारिक, मानसिक भान
पाहण्यास चांगली दृष्टी
मागेन तुला सदैव हेच दान
समाज मनाचे परिवर्तन
भुकेल्यास अन्न नि वस्त्र
हक्काचे छप्पर डोईवर
मागेन तुला आशिष अस्त्र
पावसाला विनवणी
बरस राजा वेळेवर खरा
बळीराजा व्याकुळ झालाय
मागेन तुला पीकपाणी बरा
भरकटलेली पिढी पाहता
सुबुद्धी दे ना सह्रदयाची
बालकांना सुसंस्कार, ज्ञान
मागेन तुला शक्ती लढण्याची
वृद्धांना जगण्याचा आधार
कुटुंबवत्सल माणूस दिसावा
मातृपितृ देवो भव तथ्य
मागेन तुला ऋण मुक्ती विसावा
मंत्र तंत्र विद्या बालंट नको
सामान्य जनतेचा कौल हवा
सत्तेचाही खरा चेहरा पाहून
मागेन तुला मजबूत पाया नवा
हक्काचे शिक्षण हरेकास
स्वकष्टाची भाकरी मिळावी
दलालांचा व्यवहार पारदर्शी
मागेन तुला भूमी सुजलाम् दिसावी
देवाच्या दारी मनस्वी आनंद
चोरट्यांचा बाजार इथला हरावा
ओंजळीत सुगंधी फुले घेत
मागेन तुला नतमस्तक भक्त धरावा
पवित्र शिक्षण क्षेत्रास वरदान
महात्मा, सावित्री पुनश्च यावे
पेपर फुटीचा खेळ मांडलाय
मागेन तुला ईडापीडा तत्पर जावे
स्वरचित
डॉ.सौ.राजश्री संजय जाधव सोलापूर
९४२०४८८७३३