Перейти к содержимому

गीता ज्ञानेश्वरी - Part - 1| अध्याय पहिला | Geeta Dnyaneshwari- Part 1 | अर्जुनविषादयोग 1.1

Dnyanda Prakashan

0:00 / 0:00

गीता ज्ञानेश्वरी - Part - 1| अध्याय पहिला | Geeta Dnyaneshwari- Part 1 | अर्जुनविषादयोग 1.1

408 просмотров · 1 месяц назад
Dnyanda Prakashan
682 подписчика
408 просмотров · 1 месяц назад
भगवान् श्रीकृष्णांनी अर्जुनाला महाभारतातील युद्धाच्या प्रसंगी जो उपदेश केला तो उपदेश ज्या ग्रंथ रूपाने प्रसिध्द आहे तो ग्रंथ म्हणजे श्रीमद्‌भगवद्‌गीता आणि त्या उपदेशाचे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरणांसह केलेले प्रतिपादन म्हणजे श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ होय. या दोन्ही ग्रंथांचे दिव्य ज्ञान म्हणजे मानव प्राण्याला मुक्तीच्या दिशेने नेणारा अनमोल खजिना आहे.  गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे एकूण १८ अध्याय आहेत. त्या पैकी पहिले ५ अध्याय आम्ही आमच्या " ज्ञानदा प्रकाशन " या चॅनल वर उपलब्ध करून देत आहोत. गीतेच्या ७०० श्लोकांपैकी २३३ श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या ९०३३ ओव्यां पैकी १३३१ ओव्यांचे दिव्य ज्ञान या पाच अध्याया मधून आपणास प्राप्त होणार आहे. विडिओ अपलोड झाल्या नंतर आपणास तो प्रथम प्राप्त होण्यासाठी " ज्ञानदा प्रकाशन " या आमच्या चॅनल ला सब्सस्क्राईब करावे. या पहिल्या अध्यायातील पहिल्या विडिओ मध्ये आपणास गीतेच्या पहिल्या अध्यायाचे संपूर्ण ज्ञान श्लोक आणि त्यांच्या अर्थासहित प्राप्त होणार असून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या २६ ओव्यां आणि त्यांचा अर्थ प्राप्त होणार आहे. हा विडिओ पहातांना काॅंप्युटर चा उपयोग केल्यास छान वाचन करता येते. मोबाईल वरून वाचन करतांना जर अक्षरे छोटी दिसत असल्यास विडिओ च्या खालच्या भागाला स्पर्श करून खाली खेचावे आणि मग अक्षरे आपणास हवी तेवढी मोठी करून छान वाचन करावे. मोबाईल आडवा धरून सुद्धा छान वाचन करता येते. एकदा ग्रंथ वाचनाची पध्दत समजून घेत‌ल्यास थांबून शांतपणे अगदी सहज वाचन होते. विडिओ पाॅज करून प्रथम एका पेज वरील श्लोकांचे वाचन करावे. आणि नंतर पुन्हा विडिओ चालू करून पुढील श्लोकांचे पेज येईपर्यंत जे वाचन केले त्याचे चिंतन करावे अथवा "ओम् श्री कृष्ण देवाय् नमः" या मंत्राचा जप करावा व पुढील श्लोक आले की पुन्हा विडिओ पाॅज करून शांतचित्ताने पुढील वाचन करावे. ज्ञानदा प्रकाशन च्या आयकाॅन वर क्लिक करून इतर विडिओंचेही वाचन करता येते.