Перейти к содержимому

Bhushangad Fort Satara district Khatav taluka | भूषणगड किल्ला सातारा जिल्हा खटाव तालुका

weekendtravels.in

0:00 / 0:00

Bhushangad Fort Satara district Khatav taluka | भूषणगड किल्ला सातारा जिल्हा खटाव तालुका

176 просмотров · 6 дней назад
weekendtravels.in
8,85 тыс. подписчиков
176 просмотров · 6 дней назад
पुण्यापासून भूषणगड हा किल्ला साधारण 160 किलोमीटर अंतरावर आहे आणि सातारा शहरापासून सुमारे 55 किलोमीटर अंतरावर आहे. भूषणगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेला एक प्राचीन व ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. हा गड समुद्रसपाटीपासून अंदाजे 904 मीटर (300 फूट) उंचीवर आहे. खटाव तालुक्यातील दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर दुरूनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगड किल्ला आणि नवसाला पावणारी हरणाई देवी या परिसरात प्रसिद्ध आहेत. गावकऱ्यांनी गडावर पायऱ्या बांधल्या आहेत आणि वृक्षारोपण करून गड हिरवागार केला आहे. पिवळ्या जर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी आणि फुलपाखरांनी गड गजबजून गेलेला आहे. सातारा गॅझेटियरनुसार, देवगिरीच्या यादव घराण्यातील राजा सिंघण दुसरा (1210–1247) याने हा किल्ला बांधला. काही ऐतिहासिक स्रोतांनुसार हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी 1676 मध्ये वर्धनगडासोबत बांधला किंवा पुनरुज्जीवित केला असावा. 1676 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला आणि त्याची फेरउभारणी व मजबुतीकरण केले. शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला औरंगजेबाने जिंकून घेतला आणि त्याचे नाव बदलून ‘इस्लामतारा’ असे ठेवले. पेशव्यांच्या काळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. 1805 मध्ये रहिमतपूरचा शासक फतेहसिंह माने याने या किल्ल्यावर हल्ला केला. इ.स. 1848 मध्ये इंग्रजांनी साताऱ्याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला. भूषणगडवाडीतून पायऱ्यांची वाट गडावर जाते. पायऱ्यांच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायऱ्यांची रचना अशी केलेली आहे की गड चढताना तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस राहतात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरून मार्‍याच्या टप्प्यात राहतो. गडाच्या प्रवेशद्वाराची भग्न कमान नव्याने बांधलेली आहे, पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘गोमुखी’ पद्धतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारासमोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते आणि या मार्गावर एक खोल विहीर दिसते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे जागोजागी जंग्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायऱ्यांची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत. या बुरुजावरून गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदिर आहे. मंदिरावरून पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाई देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोद्धारित मंदिरात हरणाई देवीची दीड फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसवलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिद्धनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दीपमाळ आणि शेंदूर फासलेले दगड आहेत. दिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरून आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते. तटबंदीवरून चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरून संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा करून पुन्हा प्रवेशद्वारापाशी येता येते. प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायऱ्या उतरल्यावर डाव्या बाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालून जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत तटबंदीवरून दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नव्याने बांधलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते; ती करण्यास साधारण एक तास लागतो. #forts #fortsofmaharashtra #fortsinmaharashtra #fortsofindia #fortsofshivajimaharaj #fortsinindia #nature #naturelovers #drone #dronevideo #hiking #travelvlog #bhushangad Bhushangad Fort is a historic hill fortress located in the Khatav taluka of the Satara district in Maharashtra, India. Known for its unique isolated structure on a flat plain, it stands at an elevation of 2,970 feet above sea level and rises about 600 feet above the surrounding plain. It is highly regarded by travelers and trekkers for its rich history, beginner-friendly trek, and the prominent temple of Goddess Haranaidevi situated at the peak. Historical SignificanceOrigins: The fort's construction is traditionally credited to King Singhan II (1210–1247 CE) of the Seuna Yadava Dynasty of Devagiri. Maratha Empire: In 1676, Chhatrapati Shivaji Maharaj captured the fort from the Adilshahi Sultanate and heavily fortified it. It served as a strategic outpost alongside nearby fortresses like Vardhangad and Machindragad. Later Rulers: Mughal Emperor Aurangzeb later seized the fort and renamed it Islamtara. During the Peshwa era, it was managed by the Pantpratinidhi family until the British took control in 1848 following the annexation of Satara. Do not forget to Like Share Subscribe and Follow my channel. My Facebook and Instagram Page:- Facebook Page: facebook.com/Weekendtravels.in Instagram: instagram.com/weekendtravels.in