Перейти к содержимому

🇮🇳 पराक्रमाची अखंड गाथा | हृदयस्पर्शी देशभक्तीपर गीत | Marathi Patriotic Song

Rajashri Suhas Jadhav

0:00 / 0:00

🇮🇳 पराक्रमाची अखंड गाथा | हृदयस्पर्शी देशभक्तीपर गीत | Marathi Patriotic Song

272 просмотра · 2 нед. назад
Rajashri Suhas Jadhav
144 подписчика
272 просмотра · 2 нед. назад
🇮🇳 “पराक्रमाची अखंड गाथा” — देशासाठी बलिदान देणाऱ्या रणवीरांच्या शौर्याला आणि पराक्रमाला मानाचा मुजरा! 🙏 स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान आणि एकजुटीची प्रेरणा देणारे हे देशभक्तीपर गीत. 🇮🇳❤️ 🎵 गीतकार : सौ. राजश्री सुहास जाधव.©️®️ @rajashriwrites 🎶 Music & AI Vocal : Suno AI गीताचे बोल: ( lyrics) पराक्रमाची अखंड गाथा ( वनहरिणी वृत्त ) सेनानींच्या बलिदानाने स्वतंत्र झाली भारतमाता अपूर्व त्यांच्या पराक्रमाची सदा गौरवू अखंड गाथा!।।धृ।। स्वर्णधुराची या देशाची वैभवशाली ख्याती होती परकीयांच्या राजवटीने केली सारी माती-माती जोखडातुनी पार व्हावया जवान लढले नच घाबरता अपूर्व त्यांच्या पराक्रमाची सदा गौरवू अखंड गाथा!।।१।। राष्ट्रध्वजाला न्याय मिळाला प्रयत्न त्यांचे फळास आले अखंड भारत देश आमुचा स्वप्न उरीचे यथार्थ झाले धारातीर्थी पडले नंदन देशासाठी लढता लढता अपूर्व त्यांच्या पराक्रमाची सदा गौरवू अखंड गाथा!।।२।। दिवसा पुरता नको दिखावा नका आळवू नुसते गाणे जपू अस्मिता भारतभूची शान वाढवू एकजुटीने रणवीरांना त्रिवार वंदन सन्मानाने झुकवू माथा अपूर्व त्यांच्या पराक्रमाची सदा गौरवू अखंड गाथा!।।३।। सौ. राजश्री सुहास जाधव.©️®️ @rajashriwrites गीत आवडले तर ❤️ Like करा, ↗️ Share करा आणि 🔔 Subscribe करून आपल्या Channel ला नक्की साथ द्या. 🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳 #पराक्रमाचीअखंडगाथा #देशभक्तीगीत #मराठीगीत #स्वातंत्र्यदिन #MarathiPatrioticSong #MarathiSong #IndependenceDay #PatrioticSong #rajashriwrites