हंगेश्वर मंदिर , येथे श्रावणी सोमवारी तयार होतात तांदळाच्या पिंडी
Gosht Pravasachi
0:00 / 0:00
हंगेश्वर मंदिर , येथे श्रावणी सोमवारी तयार होतात तांदळाच्या पिंडी
26 723 просмотра · 5 лет назад
Gosht Pravasachi
42,6 тыс. подписчиков
26 723 просмотра · 5 лет назад
हंगेश्वर मंदिर,
पारनेर च्या पूर्वेस 8 किमी आणि सुपे गावापासून 5 किमी असणारे हंगा हे गाव. याठिकाणी हंगेश्वर महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर शके १६९३ मध्ये गंधे, जोशी कुलकर्णी बंधूंनी बांधले आहे (जास्त करून गंधे नावाचा उल्लेख होतो) . मंदिरा जवळील बारवेवर शके १६७६ चा शिलालेख आहे. हे गाव शिंदे सरकारकडे होते. येथील गंधे मंडळी शिंद्यांच्या लष्करात होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख हेर बहिर्जी नाईकही या गावचेच असे सांगितले जाते . श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरात तांदळापासून तयार होणाऱ्या पिंडीची परंपरा ही अनेक वर्षाची आहे . या पुरातण मंदिराचा दोनशे बाय दोनशे फुटांचा प्रशस्त आवार असून पायऱ्यांनी दिंडी दरवाजातून जाऊन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मंदिर ५० बाय ७५ फूट आकाराच्या उंच दगडी चौथऱ्यावर असून मंदिराला दोन सभा मंडप आणि एक गाभारा असा दगडीबनावटीचे तीन दालने आहेत. गाभाऱ्याच्या शिखरावर नक्षीदार मुर्तीकाम केले असून जमीनापासुन अंदाजे ७० ते 80 फूटावर कळस आहे. मंदिराचे पूर्व पेशवेकालीन रेखीव वास्तू शिल्प अतिशय सुबक व मनोहर असून मंदिराचा कळस त्याची रंग संगती, कलात्मकता आकर्षक आहे. येथे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तयार होणाऱ्या तांदळाच्या पिंडीना सबळ वैज्ञानिक पुष्टी नसली तरीही या पिंडी भाविकांचे श्रध्दास्थान ठरल्या आहेत.
Video मध्ये बोलतांना काही चूक झाली असल्यास comment मध्ये नक्की सांगा. जर ती चूक असेल तर ती नक्की मान्य करू.
*आपल्या channel वर भरभरून वेगळी माहिती असलेले video कायमच येत राहणार आहे, ते बघण्यासाठी चॅनलला subscribe करा आणि bell icon वर क्लिक करा *