Перейти к содержимому

Devendra Fadanvis | Jaykumar Gore | फडणवीस सरकारचा झिजिया कर | शेतकऱ्याला ४६.१६ लाख भरण्याचे फर्मान

Lay Bhari News

0:00 / 0:00

Devendra Fadanvis | Jaykumar Gore | फडणवीस सरकारचा झिजिया कर | शेतकऱ्याला ४६.१६ लाख भरण्याचे फर्मान

8 634 просмотра · 12 ч назад
Lay Bhari News
136 тыс. подписчиков
8 634 просмотра · 12 ч назад
देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांप्रती किती क्रूर वागते याचे अत्यंत संताप जनक असे उदाहरण समोर आले आहे. एका सामान्य शेतकऱ्याला तब्बल 46.17 लाख रुपये दंड ठरवण्यात आला आहे. या शेतकऱ्याची चार एकर जमीन अगोदरच कॅनॉल मध्ये वाया गेलेली आहे. या कॅनॉलचा मुरूम संबंधित शेतकऱ्याने विनापरवाना उचलून नेल्याची महसूल विभागाचा दावा आहे. परंतु कॅनॉल ज्या पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो तो पाठारे विभाग म्हणतो की तिथे मुरुमच नव्हता. विशेष म्हणजे, मुरूम उचलून नेला याचा कोणताही पुरावा महसूल विभागाकडे नाही. असे असताना महसूल विभागाने एका व्यक्तीच्या तक्रारीवरून तब्बल 46.16 लाख रुपयांचा दंड या शेतकऱ्याला आकारलेला आहे. कृष्णत माळी असे या शेतकऱ्याचे नाव असून लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन शेतकऱ्याची मुलाखत घेतली आहे. शेतकऱ्यावर हा लादलेला दंड मी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रांताधिकार्‍यांना सूचना करून एक वर्ष झाले तरी या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. एवढेच नाही तर मंत्री जयकुमार गोरे यांनी सुद्धा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना हा दंड कमी करण्याची सूचना केली होती. परंतु प्रांताधिकारी उज्वला गाडेकर व तहसीलदार बाई माने यांनी मंत्र्यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. #लयभारी #तुषारखरात #कृष्णतमाळी #शेतकरी #शेतकरीन्याय #शेतकऱ्यांवरीलअन्याय #४६लाखांचादंड #महसूलविभाग #महाराष्ट्रसरकार #देवेंद्रफडणवीस #जयकुमारगोरे #जिल्हाधिकारी #प्रांताधिकारी #तहसीलदार #शेतकरीप्रश्न #शेतकरीआंदोलन #मुरूमप्रकरण #कॅनॉलप्रकरण #महाराष्ट्रन्यूज #मराठीबातम्या #BreakingNews #MaharashtraNews #FarmerNews #JusticeForFarmers