मोठी देवी खामगाव संपूर्ण इतिहास | मोठी आई शांती उत्सव का साजरा होतो ? कधी झाली सुरवात 🤔Mothi Devi
Maza Akola
0:00 / 0:00
मोठी देवी खामगाव संपूर्ण इतिहास | मोठी आई शांती उत्सव का साजरा होतो ? कधी झाली सुरवात 🤔Mothi Devi
4 377 просмотров · 1 г. назад
Maza Akola
61 подписчик
4 377 просмотров · 1 г. назад
मोठी देवी आई खामगाव संपूर्ण इतिहास | मोठी आई शांती उत्सव का साजरा होतो ? कधी झाली सुरवात ?
#mothidevi #खामगाव #mothiaai #जगदंबा #आई
Mothi Devi Utsav 2025 Khamgaon Maharashtra
आई राधा उदो उदो
आई राधा उदो...उदो...
संपुर्ण देशात फक्त खामगाव शहरात साजरा होणारा शांती उत्सवाला सोमवार पासून सुरुवात झाली आहे. शहरातील जलालपुरा भागात मानाच्या मोठी देवीची स्थापना करण्यात आली. यासह खामगाव शहरात विविध भागांमध्ये अनेक सार्वजनिक मंडळांकडून जगदंबा मातेच्या मुर्तीची स्थापना आली. शहरात सर्वत्र मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवार पासून सुरु झालेल्या हा उत्सव ११ दिवस चालनार असून शहरात सर्वत्र भक्तीमय वातावरण असणार आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या उत्सवानिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ता प्रयत्नशील असतात. या जगदंबा देवीस मोठी देवी म्हणून ओळखल्या जाते. मोठ्या देवीचा उत्सव म्हणजे शांती उत्सव असतो. विजयादशमीला असुरांचा संहार करून जेव्हा देवी परत येते. तेव्हा ती क्रोधीत असल्याने तीचा चेहराला लाल झालेला असतो म्हणून या देवीचा चेहरा लाल रंगाचा करण्यात येतो व तिला शांत करण्यासाठी पूजा, अर्चना, आराधना, आरती जय जयकार करुन मातेस शांत करण्याकरिता हा उत्सव साजरा करतात. म्हणून या उत्सवास 'शांती उत्सव' म्हटले आहे. या उत्सवास पुर्वी पासूनच मातेची अतिभव्य मूर्ती तयार करण्यात येते व विधीपूर्वक कोजागिरी पोर्णिमेला सायंकाळी मातेच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून दररोज सकाळी ७.३० व सायंकाळी ८.०० वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत मातेच्या आरत्या मंगलवाद्यासह होतात.जगदंबा उत्सवाला
या उत्सवा दरम्यान शहरात भक्तीमय वातावरण निर्माण होते. संपूर्ण भारतात खामगावचा उत्सव एक वेगळी परंपरा राखून आहे. नवसाला पावणारी म्हणून अख्ख्या भारतात जिची ख्याती आहे, त्याच जगदंबेला खामगाव येथे मोठ्या सन्मानाने मोठी देवी म्हणून संबोधण्यात येते. मोठ्या देवीच्या उत्सवाला खामगाव बरोबरच या परिसरातील भक्ती सागरात बुडवून टाकणारा एक उदात्त काळ असतो. शहरात विविध भागात अनेक मंडळांमार्फत जगदंबा देवी स्थापना करण्यात येते त्यामुळे या उत्सवा दरम्यान शहरात भक्तीमय वातावरण निर्माण होते.