विमानांचा अफलातून शो. Fleet Week Air Show. सॅन फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया. २०१४ मधे रेकॉर्ड केला होता
अपरिचित अमेरिका 🇺🇲
0:00 / 0:00
विमानांचा अफलातून शो. Fleet Week Air Show. सॅन फ्रांसिस्को, कॅलिफोर्निया. २०१४ मधे रेकॉर्ड केला होता
62 просмотра · 2 недели назад
अपरिचित अमेरिका 🇺🇲
33 подписчика
62 просмотра · 2 недели назад
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सॅन फ्रांसिस्को मधे लष्करी बोटींची parade असते. याच "Fleet Week" चा भाग म्हणून आठवडा संपताना शुक्रवारी, शनिवारी, आणि रविवारी हा खास विमानांचा शो होतो. चार तासांच्या या शो मधे बरीच लहान मोठी, जुनी नवीन, प्रवासी व लष्करी विमाने कर्तब करून दाखवतात.
या शो चे मुख्य आकर्षण शेवटी होणारा Blue Angels या नौसेनेच्या विमानांचा performance असतो. अतिशय वेगाने ही विमाने एकमेकांच्या खूप जवळून उडतात. सर्वात धडकी भरवणारा क्षण म्हणजे दोन विमाने विरुद्ध दिशेने समोरासमोर येऊन शेवटच्या सेकंदाला बाजूला होऊन उडतात. अजून एक Patriots नावाची टीम आहे जे वायुसेनेतून निवृत्त झालेले पायलट छंद म्हणून या शो मधे भाग घेतात.
मी ज्या ठिकाणी हा विडिओ रेकॉर्ड केला होता तिथून सॅन फ्रांसिस्कोचा प्रसिद्ध Golden Gate Bridge, समोर Alcatraz हे बदनाम असलेले तुरुंग आणि पाठीमागे सॅन फ्रांसिस्को शहर दिसते.
२०१४ मध्ये बरेच परफॉर्मन्स असायचे. मी हा शो कितीतरी वर्ष बघायला जायचो. पण गेल्या २-३ वर्षात काही विमानांनी भाग घेणे बंद केले, म्हणून हा शो थोडा निरस झाला आहे. तरीही सर्वांनी एकदा तरी या air शो चा अनुभव नक्कीच घ्यावा.
हा जवळजवळ ४० मिनिटांचा विडिओ आहे. पण तुम्हाला बघताना अजिबात कंटाळा येणार नाही.