Перейти к содержимому

वर्तमान समास दासबोध निरुपण chalu samas dasbodh nirupan | dashak 20 samas 7 nirupan आत्मानिरूपणनाम

परमार्थ साधना

0:00 / 0:00

वर्तमान समास दासबोध निरुपण chalu samas dasbodh nirupan | dashak 20 samas 7 nirupan आत्मानिरूपणनाम

13 798 просмотров · 6 дн. назад
परमार्थ साधना
8,9 тыс. подписчиков
13 798 просмотров · 6 дн. назад
समास सातवा : आत्मानिरूपण ॥ श्रीराम ॥ अनुर्वाच्य समाधान जालें । तें पाहिजे बोलिलें । बोलिल्यासाठीं समाधान गेलें । हें तों घडेना ॥ १ ॥ कांहीं सांडावें लागत नाहीं । कांहीं मांडावें लागत नाहीं । येक विचार शोधून पाहीं । म्हणिजे कळे ॥ २ ॥ मुख्य कासीविश्वेश्वर । श्वेतबंद रामेश्वर । मलकार्जुन भीमाशंकर । गुण आत्मयाचे ॥ ३ ॥ जैसीं मुख्य बारा लिंगें । यावेगळीं अनंत लिंगें । प्रचित जाणिजेत जगें । गुण आत्मयाचे ॥ ४ ॥ भूमंडळीं अनंत शक्ति । नाना साक्षात्कार चमत्कार होती । नाना देवांच्या सामर्थ्यमूर्ती । गुण आत्मयाचे ॥ ५ ॥ नाना सिद्धांचीं सामर्थ्यें । नाना मंत्रांचीं सामर्थ्यें । नानामोहरेवल्लींत सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ६ ॥ नाना तीर्थांचीं सामर्थ्यें । नाना क्षेत्रांचीं सामर्थ्यें । नाना भूमंडळीं सामर्थ्यें । गुण आत्मयाचे ॥ ७ ॥ जितुके कांहीं उत्तम गुण । तितुकें आत्मयाचें लक्षण । बरें वाईट तितुकें जाण । आत्म्याचकरितां ॥ ८ ॥ शुद्ध आत्मा उत्तम गुणी । सबळ आत्मा अवलक्षणी । बरी वाईट आवघी करणी । आत्मयाची ॥ ९ ॥ नाना साभिमान धरणें । नाना प्रतिसृष्टी करणें । नाना श्रापौश्रापलक्षणें आत्मयाचेनी ॥ १० ॥ पिंडाचा बरा शोध घ्यावा । तत्वांचा पिंड शोधावा । तत्वें शोधितां पिंड आघवा । कळों येतो ॥ ११ ॥ जड देह भूतांचा । चंचळ गुण आत्मयाचा । निश्चळ ब्रह्मावेगळा ठाव कैचा । जेथें तेथें ॥ १२ ॥ निश्चळ चंचळ आणी जड । पिंडीं करावा निवाड । प्रत्ययवेगळें जाड । बोलणें नाहीं ॥ १३ ॥ पिंडामधून आत्मा जातो । तेव्हां निवाडा कळों येतो । देहे जड हा पडतो । देखतदेखतां ॥ १४ ॥ जड तितुकें पडिलें । चंचळ तितुकें निघोनी गेलें । जडचंचळाचें रूप आलें । प्रत्ययासी ॥ १५ ॥ निश्चळ आहे सकळां ठाईं । हें तों पाहाणें नलगे कांहीं । गुणविकार तेथें नाहीं । निश्चळासी ॥ १६ ॥ जैसें पिंड तैसें ब्रह्मांड । विचार दिसतो उघड । जड चंचळ जातां जाड । परब्रह्मचि आहे ॥ १७ ॥ माहांभूतांचा खंबीर केला । आत्मा घालून पुतळा जाला । चालिला सृष्टीचा गल्बला । येणें रितीं ॥ १८ ॥ आत्मा माया विकार करी । आळ घालिती ब्रह्मावरी । प्रत्ययें सकळ कांहीं विवरी । तोचि भला ॥ १९ ॥ ब्रह्म व्यापक अखंड । वरकड व्यापकता खंड । शोधून पाहातं जड । कांहींच नाहीं ॥ २० ॥ गगनासी खंडता नये । गगनाचें नासेल काये । जरी जाला माहांप्रळये । सृष्टीसंव्हार ॥ २१ ॥ जें संव्हारामध्यें सापडले । तें सहजचि नासिवंत जालें । जाणते लोकीं उगविलें । पाहिजे कोडें ॥ २२ ॥ न कळतां वाटे कोडें । कळतां आवघें दिसें उघडें । म्हणोनी येकांतीं निवाडे । विचार पाहावा ॥ २३ ॥ मिळता प्रत्ययाचे संत । येकांपरीस येकांत । केली पाहिजे सावचित । नाना चर्चा ॥ २४ ॥ पाहिल्यावेगळें कळत नाहीं । कळतां कळतां संदेह नाहीं । विवेक पाहातां कोठेंचि नाहीं । मायाजाळ ॥ २५ ॥ गगनीं आभाळ आलें । मागुती सवेंचि उडालें । आत्म्याकरितां दृश्य जालें । उडेल तैसें ॥ २६ ॥ मुळापासून सेवटवरी । विवेकी विवेकें विवरी । तोचि निश्चय थावरी । चळेना ऐसा ॥ २७ ॥ वरकड निश्चय अनुमानाचे । अनुमानें बोलतां काये वेंचे । जाणते पुरुष प्रचितीचे । ते तों मानीतना ॥ २८ ॥ उगेंच बोलणें अनुमानाचें । अनुमानाचें कोण्या कामाचें । येथें सगट विचाराचें । काम नाहीं ॥ २९ ॥ सगट विचार तो अविचार । कित्येक म्हणती येकंकार । येकंकार भ्रष्टाकार । करूं नये ॥ ३० ॥ कृत्रिम अवघें सांडावें । कांहीं येक शुद्ध घ्यावें । जाणजाणों निवडावें । सारासार ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मानिरूपणनाम समास सतवा ॥ #dasbodh #dasbodhnirupan