GUHAGAR TOURISM | KOKAN TOURISM | गुहागर पर्यटन | पर्यटकांना साद घालणारे ठिकाण | BEST TOURIST PLACE
Dr.Subhash Khot
0:00 / 0:00
GUHAGAR TOURISM | KOKAN TOURISM | गुहागर पर्यटन | पर्यटकांना साद घालणारे ठिकाण | BEST TOURIST PLACE
121 449 просмотров · 4 года назад
Dr.Subhash Khot
2,34 тыс. подписчиков
121 449 просмотров · 4 года назад
गुहागर पर्यटन
कोकण म्हणजे जणू पृथ्वी वरील स्वर्गच आणि या स्वर्गातील गुहागर हे कोकणातल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक. गुहागर तालुक्यातील सुंदर व प्रेक्षणीय पर्यटन ठिकाणांची माहिती एकत्रितपणे पर्यटकांना मिळावी यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे.
गुहागर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर गुहागर शहरात आहे. गुहागर आपल्या वर्जिन बीच, कॉयर आइटम, नारळ, सुपारी आणि मुख्यत हापुस आंबा यांसाठी प्रसिद्ध आहे.गुहागर ते असगोली असा सुमारे ५ ते ६ कि. मी. लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा गुहागरला लाभला आहे. सुरुच्या बनातून दिसणारा चकाकत्या सोनेरी वाळूचा किनारा, त्यावर धडकणार्या शुभ्र फेसाळत्या लाटा, पूर्वेकडे लाभलेली डोंगराची पार्श्वभूमी आणि नारळी-पोफळीच्या बागातून,अथांग निळ्या सागराच्या सान्निध्यात वसलेला गुहागरचा किनारा तितकाच विलोभनीय दिसतो.
ही भगवान परशुरामांची पवित्र भूमी. चिपळूणच्या अलीकडं परशुराम घाट उतरल्यानंतर गुहागरकडं जाणारा मार्ग आहे. या गावात वड आणि पिंपळाचे विशाल वृक्ष पाहता येतात. या परिसरात फिरण्यासारखी अनेक स्थळं आहेत. उफराटा गणपती, श्री व्याडेश्वर, गाव-मळण, वेळणेश्वर, हेदवी, बामणघळ, रोहिला, तवसाळ आणि गोपाळगड ही त्यापैकीच काही ठिकाणं. दाभोळ ऊर्जा प्रकल्पापासून अंजनवेल सहा किलोमीटरवर आहे आणि तिथून गोपाळगड दोन किलोमीटरवर. गड एकूण सुमारे सात एकरांवर वसवला होता. वेलदूर गावातनं बोटीतनंही या गडावर येता येतं. अंजनवेलला एक दीपगृहदेखील आहे. गुहागर पर्यटन
संपुर्ण व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर subscribe करून bell icon नक्की दाबा जेणे करून नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला होईल!
येवा गुहागर आपलाच असा!