जळगाव-नूतन मराठा महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जीवनदर्शन प्रदर्शनाचे आयोजन.१४,१५,१६ ऑक्टो.२०२६.
LOK AaWAZ
0:00 / 0:00
जळगाव-नूतन मराठा महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जीवनदर्शन प्रदर्शनाचे आयोजन.१४,१५,१६ ऑक्टो.२०२६.
56 просмотров · 2 дня назад
LOK AaWAZ
383 подписчика
56 просмотров · 2 дня назад
लोक आवाज न्यूज(जळगाव) जळगावात कर्मवीर भाऊराव पाटील जीवनदर्शन प्रदर्शनाचे आयोजन!
शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा वारसा आता जळगावकरांना अनुभवता येणार आहे.
थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन व महारांगोळी प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, विद्यार्थी सहाय्यक समिती, जळगाव आणि रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू मा. डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे चेअरमन मा. श्री. अनिलजी पाटील उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संपूर्ण जीवनप्रवासावर आधारित भव्य महारांगोळी, त्यांच्या जीवनकार्याची दुर्मिळ छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफितींचे विशेष सादरीकरण करण्यात येणार आहे.
१४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२६ या तीन दिवसांत सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन विद्यार्थी, पालक आणि सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा जो महान विचार दिला, तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
त्यामुळे जळगाव शहर आणि परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक तसेच शिक्षणप्रेमींनी या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिक्षणातून समाजपरिवर्तनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची जळगावकरांना पर्वणी ठरणार आहे!
* लोक आवाज न्यूज, जळगाव — स्थानिक बातम्या, जनतेचा आवाज!
#लोकआवाजNews
#जळगाव
#JalgaonNews
#कर्मवीरभाऊरावपाटील
#कर्मवीरजीवनदर्शन
#महारांगोळीप्रदर्शन
#नूतनमराठामहाविद्यालय
#रयतशिक्षणसंस्था
#विद्यार्थीसहाय्यकसमिती
#शिक्षणमहर्षी
#शिक्षणातूनसमाजपरिवर्तन
#JalgaonUpdates
#MaharashtraNews
#EducationNews
#JalgaonCity
#14October2026