संत बाळूमामांचा पाळणा 🙏 | Sant Balumama Palana | सेवकराम श्री. रामचंद्र तोरसे | चांगभलं 🚩
Ram Torase
0:00 / 0:00
संत बाळूमामांचा पाळणा 🙏 | Sant Balumama Palana | सेवकराम श्री. रामचंद्र तोरसे | चांगभलं 🚩
19 983 просмотра · 4 дн. назад
Ram Torase
94 подписчика
19 983 просмотра · 4 дн. назад
🙏 ॥ संत बाळूमामांच्या पाळणा ॥
सद्गुरु संत बाळूमामांच्या चरणी कोटी कोटी वंदन! 🙏🚩
संत बाळूमामांच्या जन्मापासून त्यांच्या दिव्य लीला, भक्ती, आशीर्वाद आणि महिम्याचे वर्णन करणारा हा भक्तिमय पाळणा प्रेमपूर्वक सादर करत आहोत. ❤️
🌺 गीत रचना व सेवेकरी: श्री. रामचंद्र तोरसे, वायाभागूरकर
🎵 गीत: संत बाळूमामांचा पाळणा
━━━━━━━━━━━━━━━━━━
🎶 संत बाळूमामांचा पाळणा – संपूर्ण गीत
[प्रस्तावना]
स्वर्गी भरला, देव दरबार ।
शंभो घेई तू, संत अवतार ।
भोळ्या भक्तांचा, तू करी उद्धार ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
भोळ्या भक्तांचा, तू करी उद्धार ।
जो बाळा जो जो रे जो ॥
[१]
उच्च-निच्च कुळी, भगवंता नसे ।
जग अज्ञानी, अहंकारी फसे ।
गरीबाघरी देवा, जन्म बारसे ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
गरीबाघरी देवा, जन्म बारसे ।
जो बाळा जो जो रे जो ॥
[२]
अकोळची भूमी, वेदगंगा तिर ।
मायाप्पा - सत्यव्वा, भक्ती अपार ।
पवित्र कुळी तू, व्हावे धनगर ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
पवित्र कुळी तू, व्हावे धनगर ।
जो बाळा जो जो रे जो ॥
[३]
ब्रह्मांड आधि हे, परब्रह्म रूप ।
जगी प्रकटते ते, हेची अप्रूप ।
भाव भक्तीचा चला, घालूया धूप ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
भाव भक्तीचा चला, घालूया धूप ।
जो बाळा जो जो रे जो…
[४]
आनंदे जमले, देव ते सारे ।
फुले उधळती, सांगते वारे ।
आकाशी थांबले, सूर्य नि तारे ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
आकाशी थांबले, सूर्य नि तारे ।
जो बाळा जो जो रे जो…
[५]
अश्विन द्वादशी, दुपारची वेळ ।
सत्यव्वा कुशी हा, जन्मला बाळ ।
बाळाच्या संगती, पांडुरंग खेळ ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
बाळाच्या संगती, पांडुरंग खेळ ।
जो बाळा जो जो रे जो…
[६]
धनगरवाड्यात, झाली हो दाटी ।
गुळ-खोबरं, साखर वाटी ।
देव अवतरला, भक्तांच्या साठी ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
देव अवतरला, भक्तांच्या साठी ।
जो बाळा जो जो रे जो…
[७]
बाराव्या दिवशी, बारसं झालं ।
निर्गुण आत्म्याला, नाव ठेवलं ।
आत्त्याच्या मुखी नाम, “बाळाप्पा” आलं ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
आत्त्याच्या मुखी नाम, “बाळाप्पा” आलं ।
जो बाळा जो जो रे जो…
[८]
हालसिद्धनाथ हे, आले धावुनी ।
बाळाला त्यांनी, घेतले उचलोनी ।
लाभला आशीष, बाळ सद्गुणी ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
लाभला आशीष, बाळ सद्गुणी ।
जो बाळा जो जो रे जो…
[९]
नाचती आनंदे, मुकी मेंढरं।
भक्तांचे करी तो, संकट पार ।
आशीष मुखी त्या, शिव्या भडिमार ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
आशीष मुखी त्या, शिव्या भडिमार ।
जो बाळा जो जो रे जो…
[१०]
बाळाचा हट्ट हा, घोंगड्यासाठी ।
भंडारा वाटवा, भक्तांच्यासाठी ।
ढोल वाजता हा, हसतो ओठी ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
ढोल वाजता हा, हसतो ओठी ।
जो बाळा जो जो रे जो…
[११]
समुद्र मंथनी तो, वासुकी हाती ।
काशीची गंगा, रोज स्नान घालती ।
मुळे सद्गुरू शिष्य, जोडितो नाती ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
मुळे सद्गुरू शिष्य, जोडितो नाती ।
जो बाळा जो जो रे जो…
[१२]
“जगाचा मालक” हा, फिरे वणवण ।
जोडिले किती हे, भाविक जन ।
कन्या अंबिल प्रसाद, वाटितो अन्न ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
कन्या अंबिल प्रसाद, वाटितो अन्न ।
जो बाळा जो जो रे जो…
[१३]
मेतके ग्रामी हा, खांब रोविला ।
दूर पळती भुते, पाहुनी त्याला ।
सप्ताह भंडारा, साजिरा केला ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
सप्ताह भंडारा, साजिरा केला ।
जो बाळा जो जो रे जो…
[१४]
भाळी भंडारा तया, लाभे वरदान ।
व्याधी दूर करी, पुत्राचे दान ।
वाईट कर्माला तो, शापाचा बाण ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
वाईट कर्माला तो, शापाचा बाण ।
जो बाळा जो जो रे जो…
[१५]
बाळूमामांचा डंका, जगात थोर ।
अक्कोळची कीर्ती, समुद्रपार ।
गावोगावी आज, उभे मंदिर ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
गावोगावी आज, उभे मंदिर ।
जो बाळा जो जो रे जो…
[१६]
केलं पावन जगी, आदमापूर ।
भक्तांचा येथे, लोटतो पूर ।
काशी अयोध्या हे, पंढरपूर ।
जो बाळा जो जो रे जो…
[धृवपद]
काशी अयोध्या हे, पंढरपूर ।
जो बाळा जो जो रे जो…
[१७ – भावपूर्ण समारोप]
मामांचा पाळणा, शब्दांची फुलं ।
सेवकराम मुखी, काव्य हे आलं ।
बाळूमामांच्या नावानं, चांगभलं ।
जो बाळा जो जो रे जा…
[समारोप]
बाळूमामांच्या नावानं…
चांगभलं… चांगभलं…
जो बाळा जो जो रे जो…
━━━━━━━━━━━━━━━━━━
🙏 जय सद्गुरु बाळूमामा! चांगभलं! 🙏
व्हिडिओ आवडल्यास LIKE करा 👍, भक्तपरिवारासोबत SHARE करा आणि अशाच भक्तिमय मराठी गीतांसाठी CHANNEL SUBSCRIBE करा. 🔔
#संतबाळूमामा #SantBalumam #BalumamaPalana #मराठी #marathisong #balumama #adamapur #balumamachyanavanchangbhala #balumamanchasevak #balumamastatus #balumamastatus #balumamagane #balumamaadmapur #balumamaaadamapurmandir #balumamabhajan #balumamatodayepisode