JMFC - CJJD परीक्षा २०२१-२२ | कशी करायची तयारी | ऍड. गणेश शिरसाट #JMFC #mpsc
Law Marathi
0:00 / 0:00
JMFC - CJJD परीक्षा २०२१-२२ | कशी करायची तयारी | ऍड. गणेश शिरसाट #JMFC #mpsc
27 752 просмотра · 4 г. назад
Law Marathi
3,76 тыс. подписчиков
27 752 просмотра · 4 г. назад
२०२२ मध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ह्या पदासाठी २०२१ व २०२२ अशा दोन वर्षांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. ही विधी विद्यार्थ्यांसाठी, न्यायाधीश होऊ इच्छिणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. ह्या परीक्षेची तयारी कशी करावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी #LawMarathi हा व्हिडिओ घेऊन आले आहे.
मार्गदर्शक - ऍड गणेश शिरसाट
ॲड.गणेश शिरसाट ह्यांनी पुण्याच्या आय एल एस विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवून पुढे भारती विद्यापीठातून कायद्याचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.. पुढे प्रशासकीय सेवा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच ज्येष्ठ विधिज्ञ स्व. भास्करराव आव्हाड सर यांनी १९६८ साली सुरू केलेल्या आणि विधी क्षेत्रातील मार्गदर्शन आणि यशाची प्रदीर्घ अशी उज्वल परंपरा असणाऱ्या बी ई आव्हाड लॉ क्लासेसची जबाबदारी गणेश सरांनी घेतली व स्वर्गीय आव्हाड सरांच्या विश्वासाला पात्र ठरत तेवढ्याच कुशलतेने जपली देखील
आजवर गणेश सरांच्या मार्गदर्शनाखाली ६०० हुनही अधिक विध्यार्थ्यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत यश संपादीत केलं आहे. सरांचे हजारो विद्यार्थी राज्याच्या कानाकोपऱ्यात वकील, सरकारी वकील, चॅरिटी कमिशनर अशा पदांवर कार्यरत आहेत.
हा उज्वल प्रवास सुरु ठेवत सर अखंडपणे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,
असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, चॅरिटी कमिशनर , अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या सह कायदा पदवी पात्रता परीक्षा व कायद्याच्या विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शनाच कार्य करत आहेत.
http://www.LawMarathi.com हे कायदेविश्वातील बातम्या, घडामोडी, माहिती आपल्यापर्यंत मराठी भाषेत पोहचविणारे एक पोर्टल आहे.
हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.