ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम - Violinists Dr. N Rajam
Narendra Bedekar
0:00 / 0:00
ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम - Violinists Dr. N Rajam
377 просмотров · 8 месяцев назад
Narendra Bedekar
8,94 тыс. подписчиков
377 просмотров · 8 месяцев назад
#Violinists Dr. N Rajam #classical music #sanskruti Purskar
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर झालेल्या पद्मपुरस्कारांमध्ये ज्येष्ठ व्हायोलिनवादक डॉ. एन. राजम यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे.
यामुळे पद्मश्री (1984), पद्मभूषण (2004), आणि पद्मविभूषण (2026) असा तिहेरी सन्मान प्राप्त मोजक्या कलाकारात त्यांचा समावेश झाला आहे. याआधी संगीत क्षेत्रातल्या पंडित बिस्मिल्ला खान, पंडित भीमसेन जोशी, भूपेन हजारिका, उस्ताद झाकीर हुसेन, येसुदास यांच्या वाट्याला हा सन्मान आला होता (बिस्मिल्ला खान, भीमसेनजी आणि भूपेन हजारिका यांना नंतर भारतरत्नही प्रदान करण्यात आला).
महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. एन. राजम यांना शास्त्रीय संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला होता. त्यानिमित्त प्रसारित केलेली त्यांच्याविषयीची ही चित्रफीत...
लेखन : अमरेंद्र धनेश्वर
निवेदन आणि चित्रफीत निर्माण : नरेंद्र बेडेकर
Like/share/subscribe